‘पंचक’चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

'पंचक'चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

Panchak : काही दिवसांपूर्वीच ‘पंचक’चे उत्कंठा वाढवणारे टिझर सोशल मीडियावर झळकले होते. घरात पंचक लागल्याने ‘आता कोणाचा नंबर’ या भीतीने सगळ्यांची तारांबळ उडालेली दिसत होती. चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढलेली असतानाच आता या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘आता कोणाचा नंबर?’ हा प्रश्नार्थक हावभाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे.

डॉक्टर श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने प्रस्तुत ‘पंचक’ चित्रपटातील हे कोडे येत्या नवीन वर्षात म्हणजेच ५ जानेवारीला सुटणार आहे. जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्माते आहेत तर नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी मराठी सिनेसृष्टीतील मातब्बर मंडळी एकाच पडद्यावर पाहाण्याची संधी ‘पंचक’च्या निमित्ताने मिळणार आहे. या चित्रपटाचे लेखन राहुल आवटे यांचे आहे. पोस्टरमध्ये प्रत्येकजण एकमेकांकडे बोट दाखवत असतानाच आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) मात्र दोन्ही हात कानावर ठेवून ही सर्कस थांबवू पाहतोय. त्यामुळे आता आदिनाथच्या ऑपेरापुढे ही सर्कस नमते घेणार का? हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक जयंत जठार, राहुल आवटे म्हणतात, ” हा चित्रपट म्हणजे सिच्युएशनल आणि ब्लॅक कॉमेडी आहे. आपल्या आजूबाजूचा विषय, ज्याचे गांभीर्य जाऊ न देता अतिशय मजेशीर पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक कौटुंबिक सिनेमा आहे., टिझर प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनी टीझरबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सगळ्याच कलाकारांचा अभिनय अतिशय दर्जेदार आहे. त्यांच्या अभिनयाने यात अधिक रंगत आणली आहे. खोतांच्या घरात लागलेल्या या पंचकात आता कोणाचा नंबर लागणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.”

महत्वाच्या बातम्या-

‘मुस्लिम मुलाशी लग्न केल्यास हिंदू मुली त्यांचे हक्क गमावतील’, भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

Cyclone Michaung चा हाहाकार, चेन्नईत पाच जणांचा मृत्यू; एअरफील्ड बंद

अफेअरच्या चर्चांदरम्यान जान्हवी कपूरचं बड्या नेत्याच्या नातवाबरोबर महाकाल दर्शन – Video

Previous Post
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या  

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या  

Next Post
विजय डीकेच्या नुकत्याच रिलीज झालेल्या '4Three4Life' अल्बमला मिळतोय युथ प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद

विजय डीकेच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘4Three4Life’ अल्बमला मिळतोय युथ प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद

Related Posts

पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करुन जनतेला दिलासा द्या; काँग्रेस नेत्याचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई – केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई प्रचंड वाढली असून सामान्य जनतेला या महागाईने जगणे मुश्कील झाले…
Read More
Assembly Elections 2024 | एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, नेमकं कारण काय? चर्चांना उधाण

Assembly Elections 2024 | एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, नेमकं कारण काय? चर्चांना उधाण

Assembly Elections 2024 | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. उद्या सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Read More
गंगावेस तालीम देशातील दर्जेदार तालीम बनवणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

गंगावेस तालीम देशातील दर्जेदार तालीम बनवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Deputy Cm Ajit Pawar : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या तालमीचा हेरिटेज लुक कायम ठेवून गंगावेस तालीम देशातील…
Read More