अफेअरच्या चर्चांदरम्यान जान्हवी कपूरचं बड्या नेत्याच्या नातवाबरोबर महाकाल दर्शन – Video

Janhavi Kapoor Affair: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या आहेत. जान्हवी आणि शिखर पहाडिया एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जान्हवी शिखर पहाडियाबरोबर उज्जैन येथील महाकालच्या दर्शनाला गेली होती. तेथील मंदिरातील जान्हवीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत जान्हवी महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसत आहे. शिखर पहाडिया आणि जान्हवी महाकालच्या मंदिरात इतर भाविकांबरोबर जमिनीवर बसल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

जान्हवीने गुलाबी रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केल्याचंही दिसत आहे. उज्जैनच्या महाकाल मंदिरातील जान्हवी आणि शिखर पहाडियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी- धीरज घाटे

विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य, लोकसभेला चित्र बदलून काँग्रेसच विजयी होईल – नाना पटोले

मोदींच्या गॅरेंटीवर जनतेचा अढळ विश्वास; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा