विजय डीकेच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘4Three4Life’ अल्बमला मिळतोय युथ प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद

4Three4Life: आपल्या खास देसी स्ट्रिट स्टाईल परफॉर्मन्समधून ‘दिल से दिल तक’, ‘गुसबम्प्स’ आणि’ ब्ल्युब्लड’ सारखी सुपरहिट गाणी देणारा २३ वर्षाचा यंग हिप-हॉप कलाकार ‘विजय डीके’ हे नाव इतकं लोकप्रिय ठरलंय की “बस, नाम ही काफी है|” असं म्हटलं तरी हरकत नाही. विजय डीके च्या प्रॉडक्शनमध्ये जास्त प्रमाणात किंवा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात बोलली जाणारी भाषा आणि मराठी सॅम्पल्स असं एक फ्युजन तयार केलं आहे. यावर्षी विजय डीके याच्या ‘गुसबम्प्स’ गाण्याच्या व्हिडिओला १.७ मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत, तसेच, ‘K H N H’ ला ९.७ मिलिअनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून ‘दिल से दिल तक’ने १३ मिलिअन व्ह्युजचा टप्पा गाठला आहे.

बहु-भाषिक हिप-हॉप कलाकार म्हणून, विजय डीके ने ‘ब्लूब्लड’ या व्हायरल ट्रॅकने युट्युबवर १० मिलिअन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळवून सर्व फॅन्स, प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळवली. २०२२ मध्ये, त्याच्या ‘बॉम्बे के डॉन’ या गाण्याने ५.४ मिलिअन व्ह्यूज मिळवले तर ‘लॉकअप नंबर 4’ ने ७.४ मिलिअन व्ह्यूज मिळवले. लोकपरंपरागत बासरीच्या सॅम्पल्सने आणि ग्रुव्ही ट्रॅप बीट्सच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या गाण्यांच्या मार्फत ‘स्ट्रीट्स ऑफ मुंबई’ हा विषय आणि भावना अतिशय अचूक अधोरेखित करण्यात आले आहे. त्याच्या युट्युब चॅनेलवरील बरीचशी गाणी मिलिअनच्या घरात पोहोचली आहे, इतकंच नव्हे तर प्रत्येक गाण्याचे त्याच्या फॅन्सने कौतुक केले आहे.

विजय डीकेच्या युट्युब चॅनेलवर नुकतीच रिलीज झालेली ‘4Three4Life’ अल्बम मधील ‘अदाकारी (इंट्रो)’, ‘विजय डीके इन दि हाऊस’, ‘वॉर्निंग’, ‘सर्वस्व’, ‘#नोबक्षिस’, ‘चार तीन की टोली’ ही गाणी फक्त ऐकण्या पूरती मर्यादित राहणार नाही तर ही गाणी त्यांच्या त्यांच्या शैलीचा एक वेगळाच अनुभव प्रेक्षकांना देऊन जाईल हे नक्की. विशेष करुन ‘अदाकारी (इंट्रो)’ गाण्यात Mumbai Vibes अनुभवण्याची एक वेगळीच मजा आहे.

अंतरिक्ष निर्मित ‘अदाकारी (इंट्रो)’, ‘विजय डीके इन दि हाऊस’, ‘सर्वस्व’, ‘#नोबक्षिस’ गाण्यांचा कंपोझर, परफॉर्मर आणि गीतकार विजय डीके आहे. ‘वॉर्निंग’ विजय डीके ने कंपोझ केलं आहे, ते गाणं विजय डीके आणि कलम इंक यांनी गायले असून गाण्याचे शब्द देखील त्यांनीच लिहिले आहेत. ‘चार तीन की टोली’ हे विजय डीके, एँडी सिरदर्द, डी. ई. सिद, विजय दादा आणि वेस्को यांनी गायले आहे.

‘विजय डीके’च्या प्रत्येक गाण्याला जशी त्याच्या फॅन्सची साथ मिळाली त्याचप्रमाणे त्याच्यातील टॅलेंट जाणून घेऊन योग्य असा मंच देण्यासाठी त्याला ‘बिलिव्ह आर्टिस्ट सर्व्हिसेस’ कंपनीची देखील मोलाची साथ मिळाली.

महत्वाच्या बातम्या-

‘मुस्लिम मुलाशी लग्न केल्यास हिंदू मुली त्यांचे हक्क गमावतील’, भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

Cyclone Michaung चा हाहाकार, चेन्नईत पाच जणांचा मृत्यू; एअरफील्ड बंद

अफेअरच्या चर्चांदरम्यान जान्हवी कपूरचं बड्या नेत्याच्या नातवाबरोबर महाकाल दर्शन – Video