Rohit sharma : हिटमॅन झाला षटकारांचा बादशाह, ख्रिस गेलचा विक्रम मोडला

IND vs AFG:एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताने अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात अफगाणिस्तानने भारताला विजयासाठी २७३ धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने सहज गाठले. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. याच सामन्यात भारताकडून रोहित शर्माने(Rohit sharma)  शानदार फलंदाजी केली. त्याने एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावले आहे.

भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 131 धावा केल्या. त्याने एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावले आहे. याशिवाय तो एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू बनला आहे. रोहितच्या या शानदार खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

अफगाणिस्तानविरुद्ध डावाची सुरुवात करण्यासाठी रोहित शर्मा येताच त्याने आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. या सामन्यात रोहितने अवघ्या 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, त्याने 4 षटकार मारले आहेत. यासह रोहित जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला. रोहितने आता एकूण 555 आंतरराष्ट्रीय षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर त्याने या प्रकरणात ख्रिस गेलला मागे टाकले आहे. गेलच्या नावावर एकूण 553 आंतरराष्ट्रीय षटकार आहेत. तर शाहिद आफ्रिदी ४७६ षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

दरम्यान, रोहित हा विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला आहे. त्याने कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला आहे. कपिलने 1983 च्या एकदिवसीय विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध 72 चेंडूत शतक झळकावले होते.

याशिवाय रोहित शर्माने विश्वचषकातील एक हजार धावांचा टप्पा पार केला आहे. 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माने खोऱ्याने धावा काढल्या होत्या. रोहित शर्माने विश्वचषकाच्या 19 व्या सामन्यात एक हजार धावांचा पल्ला पार केला. विराट कोहलीच्या आधी तीन भारतीयांनी हा पराक्रम केला आहे. सचिन तेंडुलकर , विराट कोहली आणि सौरव गांगुली यांनी याआधी विश्वचषकात भारतासाठी एक हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

व्हायब्रंट गुजरात समिटबाबत महाराष्ट्र सरकारचा मौन का ? शरद पवार गटाचा थेट सवाल

‘नागिन’ फेम अभिनेत्रीवर मोठा आघात; Israel-Hamas युद्धात कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू

हमासच्या दहशतवादाचे समर्थन करण्याची काँग्रेसची भूमिका उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का?