समान नागरी कायदा या देशातील जनतेसाठी आवश्यक आहे – केशव प्रसाद मौर्य

लखनौ – 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी कायद्याबाबत देशात पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah)यांनीच तसे संकेत दिले असून मोठ्याप्रमाणात या निर्णयाला पाठींबा मिळेल असं दिसत आहे.

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ( 2024 Loksabha election preparation ) भाजपने (BJP) जोरदार तयारी केली आहे. त्याची ब्ल्यू प्रिंटही (Blue Print) तयार झाली आहे. भोपाळमध्ये पोहोचलेले अमित शहा यांनी भाजप कार्यालयात कोअर कमिटीची ( Amit Shah BJP meeting ) बैठक घेतली. त्यात ते म्हणाले की, समान नागरी कायदा ( Amit Shah on common civil code ) लागू करण्याची तयारी सुरू ( Amit Shah in MP ) झाली आहे. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) तयारी करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह म्हणाले की उत्तराखंडमध्ये पायलट प्रोजेक्ट ( pilot project in Uttarakhand ) म्हणून समान नागरी कायदा लागू करण्यात येणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणावर दिलेल्या या संकेताचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Uttar Pradesh Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya) यांनी स्वागत केले आहे. केशव प्रसाद मौर्य म्हणाले, खरंच आता याची गरज आहे. आमचे सरकार याच्या बाजूने आहे, समान नागरी कायदा या देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा उत्तर प्रदेशसाठी आवश्यक आहेच. पण, या देशातील जनतेसाठी आवश्यक आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख मुद्द्यांपैकी कलम 370, राम मंदिराचे बांधकाम आणि समान नागरी कायदा हे आहेत. विरोधकांनी पाठिंबा दिला तर चांगलं, विरोधक पाठिंबा देत नसेल तर आम्ही याचा विचार करणार नाही असा होत नाही.असं ते म्हणाले.