Supriya Sule | आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही, आम्ही भ्रष्टाचारातून मुक्त झालो; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

Supriya Sule | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येऊन त्यांनी बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर एक चकार शब्ददेखील काढला नाही केंद्र सरकार ईस्ट इंडिया कंपनीसारखे सर्व राजकीय पक्षांना उध्वस्त करत आहे. पक्ष फोडा, घरं फोडा या पॉलिसी विरोधात व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आगामी निवडणुका महत्वाच्या असणार आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांची बैठक आज पुण्यात आयोजित करण्यात आली होती. बूत कमिटी आणि प्रचार कशाप्रकारे करायचा या संदर्भात आज बैठकीत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यापूर्वी अनेक निवडणुका एकत्रित लढलेले आहे. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मागची ५५ वर्षे महाराष्ट्रात कुणीही नेता आला तर तो शरद पवारांना नावं ठेवतोच, कारण त्याशिवाय हेडलाईनच होत नाही. त्यामुळे अमित शाह आले होते आणि त्यांनी शरद पवार साहेबांवर टीका केली. जर टीका केली नसती तर हेडलाईन झाली नसती, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विधानसभेत झालेली मारामारी, पोलीस स्टेशनमध्ये झालेला गोळीबार, कोयता गँग व ड्रग्सवर अमित शाह बोलले असते तर आनंद झाला असता. गेल्या ६० वर्षांत पवार साहेबांवर अनेकांनी टिका केली पण ते काम करत राहिले, कुणाला उत्तर दिले नाही असेही सुप्रिया सुळे यानी सांगितले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाले की, सध्या आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. लोकांच्या सुख दुःखात आम्ही सहभागी होतो. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आहोत. आता लोकसभा निवडणूक आहे, त्यामुळे आम्ही कामाला लागलो आहोत. नेहमीप्रमाणे ज्येष्ठांच्या आशीर्वादाने मी प्रचार करते आहे. ज्याला प्रचार करायची इच्छा असेल त्यांनी प्रचार करावा. परंतु निवडणूक ही विचारांनी लढली जाते. त्यामुळे आमच्यावर जी काही टीका झाली असली तरी मला एका गोष्टीचं बरं वाटलं की, आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. तरी सुद्धा अमित शाहा यांनी जी टीका केली तो त्यांचा हक्क आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

यावर सविस्तर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझी चौथी निवडणूक आहे. माझे सहकारी, कार्यकर्ते हे माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबातले लोक हे माझा प्रचार करतात. पवार कुटुंबातले माझे सगळे भाऊ, वहिनी माझ्या घरातली मुलं, राजूदादा, वहिनी हे सगळे माझ्यासाठी म्हणजेच बहिणीसाठी उभे राहतात. या गोष्टीचा मला आनंद आहे. त्यांचा आधार मला वाटतो, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना त्यांना सरसकट कर्जमाफी का मिळत नाही? सरकारने त्यांचे वीज बिल देखील माफ करायला हवे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या : 

Mahesh Tapase | गुजरातच्या भूकंपावेळी मदतीला सर्वात प्रथम धावणारे शरद पवारांच्या योगदानाचा शहांना विसर

Amit Shah | अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, जय शाह कोणता क्रिकेट खेळला म्हणून बीसीसीआयचा सचिव केला?

Loksabha Election 2024 | “मतांसाठी शहीदांचा बाजार मांडला, उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, शाहांच्या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं