हा तर मला बदनाम करण्याचा विरोधकांचा कट – बबनराव लोणीकर

परतूर – वीज वितरण कंपनीचे आडून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले जात असून मी कुठल्याही प्रकारचा फोन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लावलेला नसून आणि माझे कुठलेही मीटर वीज वितरण कंपनीने काढून नेलेले नाही. त्यामुळे मी फोन लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी दिली आहे.

काही षडयंत्र रचणाऱ्या लोकांनी माझी व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप (viral audio clip) समाज माध्यमांमध्ये व्हायरल केली असून व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप माझी नसून ते माझ्याविरुद्ध रचलेले कुभांड असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे. माझा संभाजीनगर येथे बंगला आहे परंतु त्या बंगल्यावरील मिटर काढून नेले नाही त्यामुळे मी वीज वितरण कंपनीचे बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्या मुळे मी फोन करण्याचा प्रश्नच नाही असे लोणीकर यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारचा नाकर्तेपणा बळजबरी विरोधकावर लादण्याचा हा प्रयत्न असून वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी ग्रामीण भागासह शहरी भागात घरोघरी जाऊन लोकांना धमकावत असल्याचेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे. खरेतर गेल्या दोन वर्षातील कोरोनामुळे (corona )जनसामान्यांचे कंबरडे मोडले असून अशा परिस्थिती मध्ये वीज वितरण कंपनीने वीस सक्ती करायला नको आहे परंतु आघाडी सरकार (mahavikas aaghadi) सर्व सामान्यांचे दुःख समजून घ्यायला तयार नसून अगोदरच आर्थिक कमकुवत असलेल्या वीज ग्राहकांवर अन्याय करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.