Archana Patil | अर्चना पाटलांच्या ‘युवा संवाद संमेलना’ला तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Archana Patil | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मित्र पक्षातील युवा नेतृत्व आणि कार्यकर्त्याचा मेळावा पार पडला. या युवा संवाद संमेलनाला जनतेचा मोठा प्रतिसाद बघायला मिळाला. उद्याच्या भविष्यासाठी आजचा युवा सज्ज झाला आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी निर्धाराने मोठ्या संख्येने पुढाकर घेत आहे. उस्मानाबाद लोकसभा क्षेत्रातील महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 400 पार हा नारा पूर्ण होणार हा विश्वास युवकाच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अधोरेखित झाल्याची प्रतिक्रिया अर्चना पाटील (Archana Patil) यांनी दिलीय.

विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी उद्याचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी सकारात्मक कार्यासाठी, देशहिताच्या धोरणासाठी नरेंद्र मोदी यांना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी धाराशिव लोकसभा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी महायुतीची नवक्रांती घडविण्याचा संकल्प या महायुती महासंमेलनात झाला.

या युवा मेळाव्यात 18 ते 25 वायोगटातील तरुण – तरुणी देशाच्या नवनिर्माणाच्या या कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत व त्यामधून लोकशाही बळकट करण्याकरिता पहिल्यांदा मतदान करणार आहेत. महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प सर्व युवकांनी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन