Prakash Ambedkar | काँग्रेसचा न्यायाशी काहीही संबंध नाही! रोहित वेमुला प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांची टीका

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर सडकून टीका केली. रोहीत वेमुला आत्महत्या प्रकरण तेलंगणातील काँग्रेस सरकारने बंद केल्याने त्यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, रोहित वेमुला हा दलित नव्हता, असे रोहित वेमुला हत्या प्रकरणाच्या तपासाच्या क्लोजर रिपोर्टमध्ये, तेलंगणा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

रोहित वेमुलासाठी काँग्रेसचा न्याय

⚫️ आपली “खरी जातीय ओळख” सापडेल या भीतीने रोहितने आत्महत्या केली.

⚫️ त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या कोणत्याही वस्तुस्थितीचा किंवा परिस्थितीचा पुरावा रेकॉर्डवर उपलब्ध नाही.

⚫️ त्याच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही.

⚫️ तपास अधिकाऱ्यांनी राधिका वेमुला यांना विचारले की, जात निश्चित करण्यासाठी त्या डीएनए चाचणी करण्यास तयार आहेत का?

काँग्रेस न्यायाची व्याख्या अशी करते का? रोहितची आई, बहीण आणि भावासाठी हा तुमचा न्याय आहे का? शैक्षणिक संस्थांमध्ये दर मिनिटाला भेदभाव आणि छळ होत असलेल्या एससी आणि एसटी विद्यार्थ्यांसाठी हा तुमचा न्याय आहे का? दलितांसाठी हा तुमचा न्याय आहे का? माझा काँग्रेसला सल्ला आहे की, न्याय शब्दाचा अर्थ काय आहे आणि तो कशासाठी वापरतात हे आपल्याला माहित नसेल तर ‘न्याय’ हा शब्द इतक्या सहजपणे वापरणे थांबवा. न्याय ही क्षुल्लक संज्ञा नाही. काॅंग्रेस आणि तिची जातीय वर्चस्ववादी वृत्ती खाली खेचा, असा घणाघात प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) काँग्रेसवर केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय