‘या’ करोडपती कुटुंबाने आपली अफाट संपत्ती सोडली, विलासी जीवनाचा त्याग केला आणि साधू बनले

गुजरातमधील सर्वात यशस्वी हिरे व्यापाऱ्यांपैकी एक असलेल्या दीपेश शाह (Deepesh Shah) यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे आणि ते अतिशय विलासी जीवन जगत आहेत. मात्र, आता या व्यावसायिकाने आणि त्याच्या पत्नीने आपला व्यवसाय गुंडाळून तपस्वी जीवन जगण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ते आपल्या प्रचंड संपत्तीचा त्याग करणार आहेत.

एका दशकापूर्वी, याच व्यापाऱ्याचा मुलगा भाग्यरत्न आणि त्याच्या मुलीने संन्यासी जीवन जगण्याचा निर्णय घेतला आणि अफाट संपत्तीचा त्याग केला. आता त्याचे आई-वडील दिपेश आणि पिका यांनीही असेच आयुष्य निवडले आहे. असे जीवन जगण्याच्या तयारीत दिनेश शहा यांनी आधीच 350 किमी चालले आहे तर त्यांची पत्नी पिका हिने महिला भिक्षूंसोबत 500 किमी अंतर कापले आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील हा हिरे व्यापारी आणि त्याची पत्नी दरवर्षी 15 कोटी रुपये कमवत होते.

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, दीपेश शाह म्हणाले की, जेव्हा माझ्या मुलीने दीक्षा घेतली तेव्हा आम्हालाही तिच्या मार्गावर चालण्याची इच्छा होती. मी संपत्ती आणि यश मिळवले, परंतु अंतिम शांती आणि आनंदाचा शोध कधीच संपला नाही.