Mamata Banerjee : ‘एनडीए सरकार पडणार’, पीएम मोदींच्या शपथविधीपूर्वी ममता बॅनर्जींचे मोठे भाकीत

Mamata Banerjee : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ (Narendra Modi Oath Ceremony) घेणार आहेत. त्यांचा शपथविधी सोहळा रविवारी (9, जून) होणार आहे. मात्र, मोदी 3.0 सरकारच्या शपथविधीपूर्वी टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोठा दावा केला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, हे सरकार फार काळ टिकणार नाही.

ममता बॅनर्जी यांनी दावा केला की, “भाजपचे अनेक नेते काही दिवसांतच पक्ष सोडू शकतात.” भाजपचे अनेक नेते खूप नाराज आहेत. हे सरकार फार काळ टिकणार नाही.

तृणमूल काँग्रेस शपथविधीला उपस्थित राहणार नाही
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला तृणमूल काँग्रेस उपस्थित राहणार की नाही? या प्रश्नाला उत्तर देताना सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांना आमंत्रण मिळालेले नाही किंवा त्या शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत. तृणमूल काँग्रेस शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे टीएमसी प्रमुखांनी सांगितले. आम्हाला शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळालेले नाही. त्या पुढे म्हणाल्या की, देशाला बदलाची गरज आहे, आम्ही राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. जनादेश आल्यावर नरेंद्र मोदींनी पंतप्रधान होऊ नये. आज इंडिया आघाडीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही, याचा अर्थ भविष्यात आम्ही तसे करणार असे नाही.

सीएए रद्द झालाच पाहिजे- ममता बॅनर्जी
त्याचवेळी ममता बॅनर्जी यांनी सीएएबाबत भाजपवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की सीएए रद्द करावा लागेल. ही मागणी आम्ही संसदेत मांडणार आहोत. मला माफ करा, पण मी असंवैधानिक, बेकायदेशीर पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी शुभेच्छा देऊ शकत नाही. माझ्या शुभेच्छा देशासाठी असतील, मी सर्व खासदारांना सांगेन की, पक्ष मजबूत करा. तुमचा पक्ष आम्ही तोडणार नाही, पण तुमचा पक्ष आतून फुटेल, तुमच्या पक्षात लोक खूश नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

Naseem Khan : महाराष्ट्रात मराठा, मुस्लिम व धनगर समाजाला त्वरित आरक्षण द्या – नसीम खान

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्या, शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली इच्छा

“अयोध्येतील भव्य मंदिरासोबतच आसपासच्या शहरवासीयांचे…”, भाजपच्या पराभवावर ‘शक्तिमान’ची लक्षवेधी प्रतिक्रिया