विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून मैदानात उतरलेले राहुल नार्वेकर कोण आहेत ?

मुंबई – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. शिंदेंच्या बंडामध्ये शिवसेनेतून 39 आमदार फुटले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत (BJP) राज्यात सत्ता स्थापन केली आहे. सध्या राज्यात सत्तांतर झालंय त्यामुळे येत्या काळात विधीमंडळात काही बदल पाहायला मिळणार आहेत. यात मागच्या काही दिवसांपासून रिक्त असणारं विधानसभा अध्यक्षपद (Speaker of the Assembly) आता लवकरच भरलं जाणार आहे.

यासाठी शिवसेनादेखील अर्ज दाखल करत आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचं नाव निश्चित झालं आहे. राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी (Rajan Salavi) यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपच्या राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि राजन साळवी यांच्यात ही लढत होईल.

राहुल नार्वेकर कोण आहेत ?

राहुल नार्वेकर हे 45 वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यास ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील. राहुल नार्वेकर हे एकेकाळचे शिवसेनेचेच खंदे नेते होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत होते. आता ते भाजपाचे आमदार आहेत.  राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदार संघाचे आमदार आहेत. दरम्यान, राहुल नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. सासरे आणि जावई यांची जोडी महाराष्ट्राच्या विधी मंडळावर पाहायाला मिळू शकते