स्ट्रेचमार्क्स समूळ जाण्यासाठी हे उपाय करून बघाच !

पुणे : बाळाच्या जन्मा नंतर आई अनेक शाररिक मानसिक त्रासातून जात असते . ९ महिने बाळाच्या योग्य वाढीसाठी पौष्टिक अन्न खाणारी आई बाळाच्या जन्मानंतर मात्र स्वतःच्या वजनाची चिंता करू लागते . पण जो पर्यंत बाळ आईच्या दुधावर अवलंबून असते तो पर्यंत तिला थकवा , वाढते वजन , शरीरावर दिसणारे स्ट्रेच मार्क याचा केवळ मनावर ताण येत असतो .

पण थोडं थांबा … भलेही तुम्हाला वाढते वजन यावर लगेच काही करता येत नसेल तरी स्वतःच्या त्वचेची काळजी तुम्ही नक्की घेऊ शकता . बरोबर ना ? प्रेगन्सी मध्ये आणि नंतर शरीरावर ब्लॅक पॅचेस आणि स्ट्रेच मार्क येतात . हे समूळ जाऊ शकतात . यासाठी काही उपाय हे डिलेव्हरी नंतर लगेचच सुरु करायला हवेत . आणि जरी डिलिव्हरी होऊन बरेच दिवस लोटले असतील तरी हे उपाय अवश्य करा .

यासाठी बाळंपणात आईच्या संपूर्ण शरीराला देखील तेलाचा योग्य मसाज होणे आवश्यक आहे . यामध्ये वेगवेगळ्या तेलांचा वापर करता येऊ शकतो . सुरुवातीचे दिवस खोबऱ्याचे तेल वापरावे . खोबऱ्याचे तेल थंड असते . शरीराची झीज भरून काढण्यासाठी हे खूप चांगले आहे . त्यानंतर १० दिवस बदामाचे तेल आणि १० दिवस तिळाचे तेल वापरा . असे सव्वा महिने आईला शेक शेगडी दिली जाते . या तेलांच्या मसाजने शरीराची झीज आणि स्ट्रेच मार्क्स आणि डाग जायला मदत होते .

तसेच अंघोळीसाठी मसूर डाळीचे पीठ त्यामध्ये आंबे हळद घालून मसाज करा . सामान्यतः पोट आणि कंबरेवर अधिक स्ट्रेच मार्क्स येत असतात . या मार्क्सवर या मिश्रणाचा अधिक मसाज करा . शेक घेतल्यानांतर बॉडी लोशन लावायला विसरू नका . तुमची थोडाही स्वतःची घेतलेली काळजी तुमच्या पोस्टपार्टम डिप्रेशन मधील एक समस्या दूर करेन . बाळाच्या जन्मासाठी संपूर्ण १ वर्ष तुम्हाला शरीर झिजवावे लागले आहे . त्यामुळे सव्वा महिना केवळ काळजी घेणे पुरेसे नाही . कमीत कमी डॅमेज स्किन वर वर्षभर आणि पुढे जमेल तेव्हा आणि जमेल तितक्या वेळा तेलाचा मसाज आणि मसूर पीठ आंबे हळदीचा वापर करा . शरीरावरील सर्व व्रण समूळ जाऊ शकतात . बाजारात अनेक प्रॉडक्ट्स देखील उपलब्ध आहेत . परंतु हे घरगुती उपाय कमी किमतीत चांगला परिणाम देऊ शकतात .