अजूनही माझ्‍या राजकीय निवृत्तीची वेळ आलेली नाही, २०२४ मध्‍ये…  :  शरद पवार 

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल संभाजीनगरमध्ये  पत्रकार परिषद घेतली आहे त्यामध्ये ते बोलताना म्हणाले की अजूनही माझ्‍या राजकीय निवृत्तीची वेळ आलेली नाही. २०२४ मध्‍ये देशातील चित्र बदलण्‍यासाठी आम्‍ही कष्‍ट करणार आहोत. भाजपाची भूमिका समाजविरोधी आणि फुट पाडणारी आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडून भाजपा आणि मोदीं सरकार विरोधात बिहार आणि कर्नाटक या दोन राज्यात देशपातळीवर दोन सभा घेण्यात येतील. याबाबत 1 सप्टेंबरच्या सभेत पुढील रणनीती ठरवण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना म्हणत होते.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की गेल्या आठ-दहा दिवसांपासून मी महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहे. दोन दिवसांपूर्वी सोलापूरच्या सांगोला परिसरात सुमारे 1000 लोकांनी माझी गाडी वेगवेगळ्या ठिकाणी अडवली. पुणे, सातारा आदी ठिकाणचे अनेक कार्यकर्ते मला भेटायला आले. मी उद्या बीडच्या दौऱ्यावर आहे. मी जिल्ह्यात जावो ना जावो लोकं मला साथ देतात हा माझा अनुभव आहे. आम्ही मविआ म्हणून एकत्रित लोकांसमोर जाणार आहोत. महाराष्ट्रातल्या तरुणांनी कोणत्या रस्त्याने जायचे ते ठरवले आहे. त्याचा निकाल २०२४ च्या निवडणुकीत दिसेल असा विश्वास शरद पवार साहेब यांनी व्यक्त केला आहे

शरद पवार  यावर सविस्तर बोलताना  म्हणाले की, भाजपाची भूमिका समाजविरोधी आणि फुट पाडणारी आहे. इंडिया आघाडीची पुढची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीत भाजपा विरोधात लढण्यासाठी यशस्वी रणनीती बनवणार आहे. इंडिया आघाडी देशपातळीवर दोन सभा घेणार असून याबाबत 1 सप्टेंबर रोजीच्या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात येईल. बिहार आणि कर्नाटकात दोन सभा घेण्यात येणार असून भाजपा आणि मोदींविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही शरद पवार साहेब यांनी सांगितले.

शरद पवार  म्हणाले की, भाजपाला लोकांमध्ये तेढ निर्माण करायचा आहे. धर्म आणि समुदायाच्या आधारावर त्यांना लोकांमध्ये फूट पाडायची आहे. भाजपाकडून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सरकार अस्थिर केले आहे. आमच्याकडे अनेक उदाहरण आहेत. केंद्राच्या सत्तेचे गैरवापर करून निवडून आलेली सरकार पाडणे, मध्यप्रदेश कमलनाथ यांचे सरकार पाडले गेले. सत्तेचा वापर करून महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार कसं पाडलं हे सर्वांना माहित आहे. भाजपकडून केंद्रातील सरकारचा गैरवापर करून अनेक राज्यात ईडीच्या धाक दाखवून सरकार पाडण्यात येत आहे असे देखील शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे. मला एका राजकीय नेत्याने म्हटले आहे की राज्यात नेत्यांपेक्षा ईडी जास्त निर्णय घेते असेही सांगितले आहे.

देशातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जातीय तेढ निर्माण केले जात आहे. दुसरीकडे मणिपूर जळतंय तरी त्यावर बोलायला राज्यकर्ते तयार नाहीत. काल स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी पंतप्रधानांनी तर देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घेतले असे वाटत होते. ते म्हणाले की मी पुन्हा येईल. ज्या प्रमाणे फडणवीस पुन्हा आले पण खालच्या पदावर. तसेच मोदी देखील येत्या काळात कसे येतील? असे सध्या मला सांगता येणार नाही असेही शरद पवार साहेब यांनी  म्हटले आहे.