अभिनेता Vidyut Jamwal वादाच्या भोवऱ्यात, पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?

Vidyut Jamwal : विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘क्रॅक: जीतेगा तो जिएगा’मुळे चर्चेत आहे. काल प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, अभिनेत्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेता पोलीस स्थानकात दिसत आहे. वृत्तानुसार, ४३ वर्षीय विद्युतला मुंबईतील वांद्रे येथे रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने ताब्यात घेतले.

व्हायरल फोटो पाहून असे दिसते की विद्या जामवालसोबत सर्व काही ठीक नाही. धोकादायक स्टंट केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अभिनेत्याला ताब्यात घेतले आहे. ‘क्रॅक: जीतेगा तो जिएगा’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर एका दिवसानंतर ही घटना समोर आली आहे. आदित्य दत्त दिग्दर्शित, आगामी नाट्यमय ॲक्शन चित्रपटात एमी जॅक्सन, अर्जुन रामपाल आणि नोरा फतेही हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्युतने (Vidyut Jamwal) त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ॲक्शन स्टंट केल्याचे वृत्त आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्याच्यावरील आरोपांना अद्याप पुष्टी मिळालेली नाही. अभिनेता विद्युत जामवाल याने अनेक सिनेमांमध्ये धोकादायक स्टंट करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता धोकादायक स्टंटमुळेच अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विद्युत जामवाल फक्त अभिनेता नाही तर, मार्शल आर्टिस्ट देखील आहे. ‘कमांडो’ सिनेमानंतर अभिनेत्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. अभिनेत्याने फिल्मफेअर पुरस्कार देखील जिंकला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी