Uddhav Thacekray | “नितीन गडकरीजी, भाजपाचा राजीनामा द्या अन् मविआमध्ये या; आम्ही निवडून आणू”

Uddhav Thacekray | ‘अबकी बार, ४०० पार’चा नारा देत भाजपने लोकसभेसाठी कंबर कसली आहे. लोकसभेसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव नाही. त्यावरुन विरोधकांनी भाजपला घेरले आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना थेट महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिली आहे.

काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या कृपाशंकर सिंह या भ्रष्ट माणसाचे नाव पहिल्या यादीत होते. पण नितीन गडकरी यांचे नाव नाही. नितीन गडकरीजी भाजपाचा राजीनामा द्या. महाविकास आघाडीमध्ये या. आम्ही महाविकास आघाडीतून तुम्हाला निवडून आणतो, अशी खुली ऑफर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thacekray ) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

तसेच निवडणुका आल्यावर सबका साथ, मेरा परिवार आणि निवडणूक झाल्या की मेरा दोस्त. त्यांच्या मतलबासाठी भाई और बहनो. मतलब पूर्ण झाले की तुमच्याकडे बघत पण नाहीत, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा