Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

अलीकडेच महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे, ज्यांच्याबरोबर ते बसले आहेत, त्यांनी कलम 370, सर्जिकल स्ट्राईक, राम मंदिर, छत्रपती संभाजीनगर नामकरणाला विरोध केला. मग तुम्ही त्यांच्याबरोबर कसं राहू शकता. असं वक्तव्य अमित शाह यांनी केले होते. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमित शाह (Amit Shah हे शेपूट घालणारे गृहमंत्री आहेत, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह महाराष्ट्रात आले होते. मणिपूर पेटलं तिथं जायची त्यांची हिंमत झाली नाही. तिथे शेपूट घातलं आणि महाराष्ट्रात येत आहेत. फणा काढत आहेत. हा नागोबा. काश्मीरमध्ये जायची त्यांची हिंमत नाही. अरुणाचलमध्ये चीन घुसलंय तिथे जात नाही. तिथेही शेपूट घातलंय. असा हा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला आणि आमच्यावर फणा काढून गेला. माझ्यावर काय बोलले त्याचा मी नंतरच्या सभेत समाचार घेईल. पण त्यांची या राज्यांमध्ये जायची हिंमत होत नाही, असा हल्लाच उद्धव ठाकरे यांनी चढवला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Mahesh Tapase | गुजरातच्या भूकंपावेळी मदतीला सर्वात प्रथम धावणारे शरद पवारांच्या योगदानाचा शहांना विसर

Amit Shah | अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, जय शाह कोणता क्रिकेट खेळला म्हणून बीसीसीआयचा सचिव केला?

Loksabha Election 2024 | “मतांसाठी शहीदांचा बाजार मांडला, उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, शाहांच्या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं