Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Sharad Pawar on Sunil Shelke  | मला ‘शरद पवार‘ म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही, असं म्हणत शरद पवार यांनी सुनील शेळकेंवर (Sunil Shelke) निशाणा साधला आहे. लोणावळ्याच्या (Lonavala) सभेत पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. यानंतर आमदार सुनिल शेळके यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

शेळके म्हणाले (Sunil Shelke) की, आज मावळ येथे पवार साहेबांनी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा मेळावा आणि बैठक आयोजित केली होती. याच्या आयोजकांनी मागच्या आठ दिवसांपूर्वी मावळ तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते अजित पवारांची साथ सोडून पवार साहेबांसोबत यायला तयार आहेत, आपल्या हस्ते अनेकांन पक्ष प्रवेळ करायचा आहे असं खोटं सांगून पवार साहेबांना मावळ येथे निमंत्रित केलं. कार्यक्रम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ३५ ते ४० कार्यकर्तेच उपस्थित होते. सभागृहात मित्र पक्षांचे १५० ते २०० कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. परिस्थिती पाहिल्यावर आयोजकांनी शरद पवारांना चुकीच्या पद्धतीने माहिती दिली. सुनिल शेळकेनी कार्यकर्त्यांना दम दिला असं खोटं देखील सांगितलं. साहेबांनी (शरद पवार) देखील त्याबद्दल लगेच प्रतिक्रिया दिली.

शेळके पत्रकार परिषदेत पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार आमचे श्रद्धेय आहेत, उद्या देखील राहतील. पण साहेबांनी या बाबतीत वक्तव्य करताना शहानिशाकरणं अपेक्षित होतं. मागील ५० ते ५० वर्षांचा राजकीय इतिहास पाहिला तर साहेबांनी कुठल्याही पदाधिकाऱ्यावरती टीका केली नाही. विरोधकांवर देखील व्यक्तीगत टीका केली नाही. पण साहेबांनी माझ्याबद्दल असं वक्तव्य केलं याचं मला आश्चर्य वाटतंय, असेही आमदार सुनिल शेळके यावेळी म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

मी साहेबांना भेटणार असून त्यांनी मी कोणच्या वाटेला गेलो, माझी काय चूक झाली ते सांगावं. मी कार्यकर्त्यांना दम दिला ही माहिती ज्यांनी दिली ती खरी की खोटी दिली हे आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं. साहेबांनी केलेल्या वक्तव्याची मी दखल घेणार. पुढील आठ दिवसात मी दम दिला असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा आणि पुराव्यानिशी माहिती द्यावी, अन्यथा मी राज्यभर सांगणार की मावळ तालुक्यात येऊन साहेबांनी (शरद पवार) माझ्यावर खोटे आरोप केले, असेही सुनिल शेळके यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

Mahesh Tapase | गुजरातच्या भूकंपावेळी मदतीला सर्वात प्रथम धावणारे शरद पवारांच्या योगदानाचा शहांना विसर

Amit Shah | अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, जय शाह कोणता क्रिकेट खेळला म्हणून बीसीसीआयचा सचिव केला?

Loksabha Election 2024 | “मतांसाठी शहीदांचा बाजार मांडला, उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, शाहांच्या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं