Dolly Sohi | अभिनेत्री डॉली सोहीचा कँसरमुळे मृत्यू, काही तासांपूर्वीच बहिणीचेही झाले होते निधन

Dolly Sohi |  टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘झनक’ फेम अभिनेत्री डॉली सोहीचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले आहे. अभिनेत्री गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने ग्रस्त होती. दुःखाची गोष्ट म्हणजे काल रात्री तिची बहीण अमनदीप सोही (Dolly Sohi) हिनेही जगाचा निरोप घेतला. अमनदीपवर काविळीवर उपचार सुरू होते. इंडस्ट्रीतील दोन बहिणी आणि अभिनेत्रींच्या अवघ्या काही तासांतच झालेल्या निधनाने सर्वांनाच अवाक केले आहे.

डॉली-अमनदीप सोही आता राहिले नाहीत
शुक्रवारचा दिवस टीव्ही इंडस्ट्रीसाठी अतिशय दु:खाचा दिवस होता. डॉली सोही आणि अमनदीप त्यांच्या दमदार अभिनयाने घराघरात प्रसिद्ध झाल्या होत्या. तिचा भाऊ मन्नू सोही याने इंडिया टुडेला या बातमीची पुष्टी केली आणि सांगितले की काही तासांतच दोन्ही बहिणी गमावल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे.

तिचा भाऊ म्हणाला- डॉलीचा आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. डॉली आणि अमनदीप या दोघाींनाही नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल अमनदीप वारली आणि आता डॉली. आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत. अभिनेत्रीच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी एक निवेदन जारी केले की, आमच्या लाडक्या डॉलीने आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. यामुळे आम्हाला धक्का बसला आहे. आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पुढील माहिती लवकरच शेअर करू.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा