उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच येणार एकाच मंचावर

नांदेड : उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती होण्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आंबेडकरांनी तर शिवसेनेकडे युतीचा जाहीरपणे प्रस्तावही दिला आहे. त्यामुळे वंचित आणि ठाकरे गटाची युती होणार का? अशी चर्चा सुरू असतानाच आता प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकचा मंचावर येणार असल्याचं वृत्त आहे.

हे दोन्ही नेते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार आहेत.येत्या २० नोव्हेंबरला शिवाजी मंदिरमध्ये प्रबोधन डॉट कॉम या संकेतस्थळाचं लोकार्पण होणार आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही नेते एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.