Eknath Shinde | काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवली, शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Eknath Shinde | शिवसेना-भाजप पवित्र युतीला डाग लावण्याचे काम ज्यांनी केले त्यांना सडेतोड उत्तर देऊन कसलीही पर्वा न करता काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आपण सोडवली, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील कामेरी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले की, आपले सरकार निधी देताना कुठलाही जातीभेद करत नाही, जातीवाद करत नाही. इथे मंदिर आणि मशिद एकत्र आहेत. हे देशाला आणि राज्याला दाखवण्यासारखे उदाहरण आहे. मुस्लिम समाजाला केवळ मतांसाठी वापरायचे आणि फेकून द्यायचे हे आपण करणार नाही. जात पात न बघता या समाज हिताचे निर्णय या सरकारने घेतले, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन १० टक्के आरक्षण दिले. कामेरी गावातील हजारो वर्षांपूर्वीचे भवानी मातेच्या मंदीराच्या विकासासाठी निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यावेळी कामेरी गावात राहणारे ज्येष्ठ सिनेकलावंत विलासराव रकटे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वैयक्तिकरित्या 5 लाख रुपयांची मदत करण्यात आली.

वाळवा येथील धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. कोयना धरणग्रस्तांप्रमाणेच येथील धरणग्रस्तांना न्याय देऊ, नागनाथ अण्णा नाईकवाडी धरणग्रस्त महामंडळाबाबत आणि त्यांच्या स्मारकासाठी निधी दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. वाळवा तालुक्यातील समस्या धैर्यशील माने सोडवतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कंटेनर कुठून कुठे पोहोचले ते हळुहळू बाहेर येईल
मला कुठली हाव नाही, पैशांचा मोह नाही. ज्यांना खोक्याशिवाय झोप येत नाही, उठता बसता खोके पुरत नाहीत त्यांना कंटेनर लागतात, असे लोक बोलतात. कंटेनर कुठून कुठे पोहोचले हे हळूहळू बाहेर येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी येथे दिला. बाळासाहेब म्हणायचे किंग बनण्यापेक्षा किंग मेकर बना परंतु त्यांच्या वारसांना सत्तेची हाव सुटली. हातचे सगळे घालवले, सोन्यासारखी माणसे गेली, पक्ष गेला. मात्र आपण सत्ता, खुर्चीसाठी कधीही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर तडजोड करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा