Sunil Tatkare | ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध नसलेला चेहरा अशा आघाडीची

Sunil Tatkare | ही लढाई केवळ सुनिल तटकरे विरुद्ध अनंत गीते एवढी सिमीत नाही ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे… ही लढाई एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी… ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध नसलेला चेहरा अशा आघाडीची आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी पेण येथील महायुतीच्या जाहीर प्रचार सभेत केली.

ऐतिहासिक आणि विशेष करून जाणीवपूर्वक संविधान आणि अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत देशाच्या एकात्मतेला तडा देण्याचा प्रयत्न तथाकथित इंडिया आघाडीच्या माध्यमातून केला जातो आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. संविधान दिन ज्यांनी साजरा करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या हेतूवरच संशय घेण्याचे पाप काही विघ्नसंतोषी लोक करत आहेत. धर्माधर्मात आणि जातीजातीमधील वातावरण बिघडवण्याचे काम अनंत गीते यांच्या माध्यमातून सुरू आहे असा थेट आरोप सुनिल तटकरे यांनी केला.

देशाची नेत्रदीपक प्रगती नरेंद्र मोदी करत आहेत आणि राज्याचा वेग एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वाढवत आहेत. अशावेळी बहुजनांच्या व्यापक हितासाठी सत्तेमध्ये असले पाहिजे हा विचार करत आम्ही महायुतीमध्ये एनडीएमध्ये सहभागी झालो अशी माहिती सुनिल तटकरे यांनी दिली.

महाराष्ट्रातील दोन टप्प्यात ज्या निवडणूका झाल्या आहेत त्यात शंभर टक्के जागा महायुतीच्या पदरात पडणारच आहेत असा ठाम दावा सुनिल तटकरे यांनी केला. योजनांबाबतीत मोदींनी तळागाळातील लोकांच्या मनात रुजवलेले प्रेम आहे. थेटपणाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ६ हजार रुपये भारत सरकारचे आणि ६ हजार रुपये राज्यसरकारचे असे १२ हजार रुपये जमा होत आहेत. व्यक्तीगत महिला लाभार्थ्यांसाठी नमो नारी अभियान सुरू आहे. महिलांना ५० लाख रुपयांचे कर्ज घेताना ३५ टक्के सबसिडी दिली आहे. माझ्या ग्रामीण भागात काबाडकष्ट करणार्‍या शेतकऱ्यांच्या घराघरामध्ये नळाद्वारे पाणी योजना नेली असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला. आज प्रगतीपथावर विकासकामे होताना दिसत आहेत असेही सुनिल तटकरे म्हणाले.

माझे सार्वजनिक काम ४० वर्षांचे आहे. मात्र अनंत गीते यांनी ३० वर्षातील काम दाखवावे…मंत्री पदाच्या दहा वर्षातील काम दाखवावे…गेल्या पाच वर्षात जे नैसर्गिक संकट आले त्यावेळी केलेले सहकार्य दाखवावे… असे थेट आव्हानच सुनिल तटकरे यांनी अनंत गीते यांना दिले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन