Eknath Shinde | पुणेकर प्रचंड हुशार आहेत, ते विरोधकांची हवा काढतील, मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका

Eknath Shinde | लोकसभा निवडणुकीची ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नसून जगभरात भारताचा सन्मान वाढवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध देशाची बदनामी करत फिरणारे राहुल गांधी यांच्यातच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. पुणेकर खूप हुशार आहेत. येत्या निवडणुकीत ते विरोधकांची हवा काढतील अशी टीका त्यांनी केली. पुण्यातील रेसकोर्स मैदानात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या विराट प्रचार सभेत मुख्यमंत्री (Eknath Shinde) बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे मोदी आणि विकासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीच आहे. लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रेकॉर्डब्रेक सभा होत आहेत. मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी या देशाची १४० कोटी जनता आतूर आहे. हीच गॅरंटी समोर बसलेल्या अथांग जनसागराने दिली आहे.

‘प्राण जाए पर वचन ना जाए’ ही मोदीजींच्या कामाची पद्धत आहे. ते म्हणाले होते कलम ३७० हटवणार आणि त्यांनी कलम ३७० हटवले व आपल्या काश्मिरला भारताशी जोडले. राम मंदिर आपल्या सगळ्यांना स्वप्नवत वाटत होते परंतु मोदीजींनी अयोध्येमध्ये भव्य राम मंदिरांची उभारणी केली आणि करोडो राम भक्तांचे स्वप्न पूर्ण झाले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

येत्या निवडणुकीत पुणेकर विरोधकांची हवा काढतील
पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर येथील महायुतीच्या चारही उमेदवारांना आपल्याला विजयी करायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी मतदारांना केले. ते पुढे म्हणाले की, पुणेकर खूप हुशार आहेत. एखाद्याच्या घरासमोरची गाडी काढायची असेल तर ते त्या गाडीची हवा काढतात. निवडणुकीत देखील विरोधी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी पुणेकर त्याची हवा काढतील, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन