‘दोन महिने उपचारात गेले, आता लवरकरच महाराष्ट्र पिंजून काढणार’, उद्धव ठाकरेंची गर्जना

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्यानिमित्ती शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभरातील शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे अनेक नेते आणि मंत्रीही उपस्थित आहेत. त्यात मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, आदेश बांदेकर यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष देसाई यांनी केले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपण लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे सांगितले आहे. ‘दोन महिने उपचारात गेले, लवकरात लवरकर महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. काळजीवाहू विरोधकांना भगव्याचे तेज दाखवणार विरोधकांची काळजी नाही. आपणच त्यांना पोसलं २५ वर्षे युतीत सडली यावर ठाम असल्याचे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

शिवसेनाप्रमुख म्हणायचे राजकारण हे गजकरण. भाजपचे सत्तेसाठी हिंदुत्वाचे कातडे पांघरले. आम्ही हिंदुत्व नाही सोडले सोडणार नाही भाजपला सोडले भाजप म्हणजे हिंदुत्व सोडले असे नाही. असं देखील यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.