ज्ञानवापी प्रकरणावर मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “प्रत्येक मशिदीत शिवलिंग…”

नागपूर – ज्ञानवापीचा जो इतिहास आहे तो आपण बदलू शकत नाही. प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पाहावे? भांडण का वाढवायचे? ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. ज्ञानवापीचा मुद्दा आहे. तो इतिहास आपण रचलेला नाही. ना आज स्वत:ला हिंदू म्हणवणाऱ्यांनी, ना आजच्या मुस्लिमांनी. ते त्यावेळी घडले.

इस्लाम बाहेरून आला, आक्रमकांच्या हाती आला. हिंदू मुस्लिमांच्या विरोधात विचार करत नाही. आजच्या मुस्लिमांचे पूर्वजही हिंदूच होते.आता आपल्याला आंदोलन करण्याची गरज नाही. हिंदू कोणाच्या विरोधात नाही. मुस्लिमांनी विरुद्ध मानू नये, हिंदूंनीही मानू नये. असा काही मुद्दा असेल तर एकत्र बसून सहमतीने मार्ग काढा, असंही ते पुढे म्हणाले.

हिंदूंनी खूप सहन केले, देशाचा तुकडासुद्धा गमावला. हिंदूंना कोणाला जिंकायचे नाही, हरवायचे पण नाही. भीती दाखवायची नाही, पण घाबरायचेही नाही. तरी समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना उत्तर द्यावेच लागेल, असेही भागवत यांनी नमूद केले.