Vijay Sales Offers | विजय सेल्‍सकडून ऍप्‍पल डेज सेलची घोषणा; आयफोन्‍स, आयपॅड्स, मॅकबुक्‍स, ऍप्‍पल वॉचेसवर आकर्षक डिल्‍स

Vijay Sales Offers | विजय सेल्‍स या भारतातील आघाडीच्‍या इलेक्‍ट्रॉनिक्‍स रिटेल साखळीने पुन्‍हा एकदा बहुप्रतिक्षित अॅप्‍पल डेज सेलला सादर केले आहे. १७ जूनपर्यंत चालणारा विजय सेल्‍स अॅप्‍पल डेज सेल भव्‍य इव्‍हेण्‍ट आहे. हा सेल विजय सेल्‍सचे १४० रिटेल आऊटलेट्स, तसेच त्‍यांची ईकॉमर्स वेबसाइट विजयसेल्सडॉटकॉमवर अॅप्‍पल डिवाईसेसच्‍या श्रेणीवर आकर्षक डिल्‍स देतो. ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स रिटेल कंपनीने आयफोन्‍स, मॅकबुक्‍स, आयपॅड्स, वॉचेस्, एअरपॉड्स, होमपॉड मिनी आणि अॅप्‍पल केअर+ च्‍या सर्व नवीन श्रेणीवर स्‍पेशल ऑफर्स सादर (Vijay Sales Offers) केल्‍या आहेत.

अॅप्‍पल उत्‍पादनांच्‍या खरेदीला अधिक उत्‍साहवर्धक करण्‍यासाठी आयसीआयसीआय व एसबीआय बँक कार्डधारक त्‍यांच्‍या खरेदीवर जवळपास १०,००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा आनंद घेऊ शकतात. तसेच, विजय सेल्‍सच्‍या स्‍टोअर्समध्‍ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कॅशीफायकडून ऑफर करण्‍यात आलेला जवळपास १२,००० रूपयांचा एक्‍स्‍चेंज बोनस मिळू शकतो.

प्रीमियम इलेक्‍ट्रॉनिक उत्‍पादनांची व्‍यापक श्रेणी आणि अपवादात्‍मक ग्राहक सेवेसाठी ओळखले जाणारे विजय सेल्‍स ग्राहकांना सर्वोत्तम उत्‍पादने आणि अद्वितीय शॉपिंग अनुभव देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. आणि आता, अॅप्‍पल डेज सेलसह अॅप्‍पल उत्‍साहींसाठी त्‍यांची बचत वाढवण्‍यासोबत सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा आनंद घेण्‍याचा हा परिपूर्ण मार्ग आहे.

विजय सेल्‍सचे संचालक निलेश गुप्‍ता म्‍हणाले, ”विजय सेल्‍समध्‍ये अॅप्‍पल डेज नाविन्‍यता व दर्जाचे सेलिब्रेशन आहे. आम्‍हाला आमच्‍या ग्राहकांना अॅप्‍पल उत्‍पादनांवर विशेष डिल्‍स आणि अद्वितीय सेवा प्रदान करण्‍याचा आनंद होत आहे. आमचा ग्राहकांना उत्तम दरांसह अद्भुत शॉपिंग अनुभव देण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे त्‍यांना योग्‍य निर्णय घेण्‍यास मदत होईल. या आकर्षक ऑफर्सचा फायदा घेण्‍यासाठी आम्‍हाला इन-स्टोअर किंवा ऑनलाइन भेट द्या आणि विजय सेल्‍ससह सर्वोत्तम अॅप्‍पल तंत्रज्ञानाचा अनुभव घ्‍या.”

● अत्‍याधुनिक आयफोन १५ खरेदी करा ६४,९०० रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या अद्वितीय किमतीत, तर आयफोन १५ प्‍लसची किंमत ७४,२९० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्‍ये आयसीआयसीआय व एसबीआय बँक कार्डसवर ६,००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे

● १२३,९९० रूपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीमध्‍ये आयफोन १५ प्रोच्या क्षमतांचा अनुभव घ्‍या आणि आयफोन १५ प्रो मॅक्‍सची किंमत १४५,९९० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्‍ये आयसीआयसीआय व एसबीआय बँक कार्डसवर ३,००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे

● आयफोन १४ ५७,९९० रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये खरेदी करा, तर आयफोन १४ प्‍लसची किंमत ६६,९९० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्‍ये आयसीआयसीआय व एसबीआय बँक कार्डसवर ३,००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे

● आयफोन १३ ५०,९९९ रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध असेल. या किमतीमध्‍ये आयसीआयसीआय व एसबीआय बँक कार्डसवर १,००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे

● आयपॅड श्रेणीचा अनुभव घ्‍या, जेथे आयपॅड नाइन्‍थ जनरेशन २४,९९० रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीत उपलब्‍ध असेल, तर आयपॅड टेन्‍थ जनरेशन २९,९०० रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीत खरेदी करता येऊ शकतो; आयपॅड एअर फिफ्थ जनरेशनची किंमत ४५,४९० रूपयांपासून सुरू होते, आयपॅड एअर ११ इंचची किंमत ५३,००० रूपयांपासून सुरू होते; आयपॅड एअर १३ इंचची किंमत ७२,००० रूपयांपासून सुरू होते. तसेच आयपॅड प्रो ११ इंचची किंमत ९१,००० रूपयांपासून सुरू होते आणि आयपॅड प्रो १३ इंचची किंमत १,१९,५०० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्‍ये आयसीआयसीआय व एसबीआय बँक कार्डसवर जवळपास ४,००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे

● उत्‍पादकतेचा अनुभव घ्‍या, जेथे एम३ चिप असलेल्‍या मॅकबुक प्रोची किंमत १,४७,८९० रूपयांपासून सुरू होते, तर एम३ प्रो चिप असलेल्‍या मॅकबुक प्रोची किंमत १७५,४९० रूपयांपासून सुरू होते. एम३ मॅक्‍स चिप असलेला मॅकबुक प्रो २८५,८९० रूपयांपासून उपलब्‍ध असेल. या किमतीमध्‍ये आयसीआयसीआय व एसबीआय बँक कार्डसवर १०,००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे

● एम३ चिप असलेला नवीन मॅकबुक एअर ९६,९०० रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध असेल, तर एम२ चिप असलेला मॅकबुक एअरची किंमत ८१,४९० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्‍ये आयसीआयसीआय व एसबीआय बँक कार्डसवर १,००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे

● एम१ चिप असलेला मॅकबुक एअर फक्‍त ६७,४९० रूपयांपासून उपलब्‍ध आहे. या किमतीमध्‍ये आयसीआयसीआय व एसबीआय बँक कार्डसवर ५,००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे

● अॅप्‍पल वॉच सिरीज९ ३६,६०० रूपयांपासून उपलब्‍ध असेल, अॅप्‍पल वॉच एसई (सेकंड जनरेशन)ची किंमत २५,९०० रूपयांपासून सुरू होते आणि अॅप्‍पल वॉच सिरीज अल्‍ट्रा २ ची किंमत ७९,८०० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्‍ये आयसीआयसीआय व एसबीआय बँक कार्डसवर जवळपास ४,००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे.

● वापरकर्ते यूएसबी सी सह एअरपॉड्स प्रो (सेकंड जनरेशन) २१,०९० रूपयांच्‍या आकर्षक दरामध्‍ये खरेदी करू शकतात, ज्‍यामध्‍ये आयसीआयसीआय व एसबीआय बँक कार्डसवर २,००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे

● सर्वोत्तम ऑडिओचा आनंद घ्‍या, जेथे होमपॉड मिनी ८,३९० रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीत उपलब्‍ध आहे, ज्‍यामध्‍ये आयसीआयसीआय व एसबीआय बँक कार्डसवर १,००० रूपयांच्‍या त्वरित सूटचा समावेश आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप