Rajan Patil : पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं… राजन पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य

Rajan Patil : सध्या भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Bhima Co-operative Sugar Factory Election) लागली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि मोहळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) विरुद्ध भाजपचे खासदार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) असा सामना होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारात धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना राजन पाटील यांनी सभ्यतेची सर्व मर्यादा ओलांडली आहे. पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच पोरं तुझ्याएवढी बाळं असल्याचे वादग्रस्त वक्तव्य राजन पाटील यांनी केलं आहे.

मोहोळ तालुक्यात एका सभेत भाषण करताना राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांची जीभ घसरली आहे. विरोधक आमच्या पोरांना बाळ म्हणत्यात… यांना माहिती आहे का पाटलांच्या पोरांना लग्नाआधी तुमच्या एवढी बाळ असत्यात, असे वादग्रस्त विधान राजन पाटील यांनी केले आहे.त्यांच्या या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.