महिला मोर्चाने सामान्य नागरिकांसाठी झटले पाहिजे – चित्रा वाघ

Chitra Wagh: ‘आपण अडीच वर्षे विरोधात होतो, आता आपण सत्तेत आहोत त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. महिला मोर्चाने सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी झटून त्यांना न्याय दिला पाहिजे,’ असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.

पुणे शहराच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपत्र वाटप व महिला मेळावा आज संपन्न झाला. यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे सरचिटणीस राजेंद्र शिळीमकर, वर्षा तापकीर, महिला आघाडी अध्यक्षा हर्षदा फरांदे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, मंजुषा नागपुरे, रुपाली धाडवे, रंजना टिळेकर यांच्या सह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते.

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, महिला ही शंभर घरे जोडू शकते. रोजचे दैनंदिन प्रश्नामध्ये पुढाकार घेऊन सामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम महिला आघाडीच्या पदाधिकाराऱ्यानी केले पाहिजे. कामातून माणूस मोठा होतो, पदाने माणूस मोठा होत नाही. त्यामुळे काम हे एकजुटीने केले पाहिजे असे मत वाघ यांनी व्यक्त केले.

शहराध्यक्ष धीरज घाटे बोलताना म्हणाले की, आजची महिला ही सक्षम आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडते. महिला अघडी हा पक्षातील सर्वात महत्वाचा घटक असून पुढच्या काळात महिला सक्षमीकरण , सबलीकरण या विषयात शहर भाजपा काम करणार आहे’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस गायत्री खडके यांनी केले.

 

महत्वाच्या बातम्या-

केसीआरच्या खुर्चीला धक्का बसणार? तेलंगणात काँग्रेसने प्राथमिक कलांमध्ये बहुमताचा 60 जागांचा आकडा गाठला

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार