हिंदुस्थानी भाऊला अखेर जामीन मंजूर; विद्यार्थी आंदोलनप्रकरणी झाली होती अटक

मुंबई – दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेवरून आंदोलनासाठी भडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युट्यूबर हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकची अखेर जेलमधून सुटका झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊचा जामीन अर्ज स्वीकारला आहे. हिंदुस्तानी भाऊची 30 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहे.

परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी काही दिवसांपूर्वी आक्रमक झाले होते. मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर देखील आंदोलन करण्यात आले होते. याच आंदोलनप्रकरणी भाऊला अटक झाली होती.

अटक करून हिंदुस्थानी भाऊला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावणी, त्यानंतर त्याच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसांची वाढ करण्यात आली. पोलीस कोठडी संपल्यानंतर हिंदुस्थानी भाऊ हा न्यायालयीन कोठडीत होता. अखेर त्याला 30 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. याबाबत हिंदुस्थानी भाऊचे वकील अनिकेत निकम यांनी माहिती दिली.