ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्यास न्यायालयाने दिली परवानगी

बंगरूळ – कर्नाटकातील हुबळी येथील ईदगाह मैदानावर गणेशोत्सव करण्यावर कर्नाटक हायकोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता ईदगाह मैदानावर गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हुबळी येथे असलेल्या ईदगाह जागेशी संबंधित याचिकेवर सुप्रीम कोर्टाने यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, या याचिकेला कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर ही जमीन सरकारच्या मालकीची आहे हे आधीच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे आणि याचिकाकर्त्याने ही मालमत्ता फक्त दोन वेळा वापरण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतली आहे. या मालमत्तेवर सरकारचा अधिकार आहे. असं कोर्टाने आपल्या निकालात म्हटलं आहे.

दरम्यान, या जागेवरील गणेश उत्सव थांबवण्याची याचिका काही जणांकडून दाखल करण्यात आली होती. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोर्टाने काल रात्री उशीरा या वादावर निर्णय देत ही याचिका फेटाळून लावली