MS Dhoni | डॉक्टरांनी खेळण्यास दिलाय नकार, तरीही दुखापतीकडे दुर्लक्ष करत सीएसकेसाठी धोनी उतरतोय मैदानात

यावेळी आयपीएल 2024 मध्ये, एमएस धोनी (MS Dhoni) सीएसकेचा कर्णधार नाही. यंदाच्या मोसमात धोनी रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. चेन्नई सुपर किंग्जला गेल्या मोसमात 5व्यांदा चॅम्पियन बनवल्यानंतर चाहत्यांना वाटलं की धोनीचा हा शेवटचा आयपीएल सीझन आहे पण धोनीने चाहत्यांसाठी आणखी एक सीझन खेळण्याचा निर्णय घेतला. गेल्या मोसमात धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर धोनीवर शस्त्रक्रिया करावी लागली होती. मात्र, या मोसमातही धोनी अनेकदा गुडघ्यावर पट्टी बांधून दिसला आहे. आता धोनीबाबत नवी माहिती समोर आली आहे.

धोनी दुखापतीकडे दुर्लक्ष करून खेळत आहे
आयपीएल 2024 मध्ये सीएसके संघ खेळाडूंच्या दुखापतींमुळे अडचणीत सापडला आहे. त्यांच्या पायाचा स्नायू फाटल्याने त्यांच्या हालचालींवर मर्यादा येत आहेत आणि ते जास्त वेळ धावू शकत नाही. ड्वेन कॉनवे दुखापतीमुळे या मोसमातून आधीच बाहेर होता, तर दीपक चहरच्या दुखापतीनेही संघाचा तणाव वाढला आहे. त्यामुळे धोनी (MS Dhoni) आपली दुखापत विसरून सीएसकेकडून खेळत आहे. रिपोर्ट्सनुसार, डॉक्टरांनी एमएस धोनीला खेळण्यास मनाई केली आहे पण धोनी खेळण्यावर ठाम आहे.

अलीकडेच धोनी पंजाब किंग्जविरुद्ध 9व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता, त्यादरम्यान धोनी पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. यानंतर अनेक माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी धोनीवर प्रश्न उपस्थित केले. वृत्तानुसार, धोनीची इच्छा असूनही तो सध्या ब्रेक घेऊ शकत नाही कारण संघातील अनेक मजबूत खेळाडू बाहेर आहेत. यामध्ये श्रीलंकेचा मथिशा पाथिराना आणि बांगलादेशचा मुस्तफिजुर रहमान यांचा समावेश आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | गड किल्ल्यांचे संवर्धन करणार, मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

Eknath Shinde | काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य, शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Raj Thackeray In Pune | मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यात, ‘या’ दिवशी घेणार जाहीर सभा