देवाची महिमा की आणखी काही…! तीन डोळे आणि तीन शिंगे असलेल्या बैलाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Bull Viral Video: सोशल मीडियावर कधी-कधी असे व्हिडिओ समोर येतात, जे पाहिल्यानंतर स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते. नुकताच असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये बैलाच्या डोक्यावर दोन नव्हे तर तीन शिंगे दिसत आहेत. एवढेच नाही तर त्याला तीन डोळेही आहेत. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचेही मन गोंधळून जाईल. बैलाचा हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हा करिष्मा पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या या बैलाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे. गाय, म्हैस, बैल आणि बकऱ्यांच्या डोक्यावर सहसा दोन शिंगे असतात, जी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दिसतात. मात्र नुकत्याच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काळ्या बैलाच्या डोक्यावर दोन नव्हे तर तीन शिंगे दिसत आहेत, तर त्याला तीन डोळेही आहेत. ज्याला पाहून युजर्सही थक्क झाले आहेत.

व्हिडिओ मंदिराचा आहे
हा व्हिडिओ आशुतोष अग्निहोत्रीने फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. हा एका मंदिरातील बैल असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये आजूबाजूला उभे असलेले लोक बैलाला पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. त्याचवेळी बैलाला तीन डोळे आणि त्रिशूळ सारखी शिंगे पाहून अनेकजण त्याच्या पाया पडताना, हात जोडतानाही दिसत आहेत. यावर युजर्स हर हर महादेव आणि जय भोलेनाथ अशा कमेंट करत आहेत.