Prakash Ambedkar | काँग्रेसचे दलित, आदिवासी, मुस्लिम प्रेम सर्व दिखाव्याचे आहे!

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राहुल गांधी यांचा फोटो ट्विट करत म्हटले आहे की, यांचे दलित, आदिवासी, मुस्लिम प्रेम सर्व दिखाव्याचे आहे. त्यांना फक्त आपले मतदान हवे आहे बाकी काही नाही. आता सांगा भाजप – आरएसएस हे एकमेकांपासून कसे वेगळे आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. काँग्रेस सरकार अंतर्गत असलेल्या तेलंगणा पोलिसांनी रोहीत वेमुला प्रकरण बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर हे ट्विट केले आहे.

तेलंगणा पोलिसांनी, काँग्रेस राज्य सरकारच्या अंतर्गत, रोहित वेमुला प्रकरण बंद केले आहे. तेलंगणामध्ये रोहितची आई राधिका ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाली होती. त्यावेळेचा राहुल गांधी राधिका वेमुलाला मिठी मारतानाचा फोटो ॲड. आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) हे ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय