BCCI Central Contracts: बीसीसीआयने जाहीर केली वार्षिक करार यादी, अय्यर-किशन बाहेर; पाहा संपूर्ण यादी

BCCI Central Contracts: बीसीसीआयने खेळाडूंच्या वार्षिक कराराची यादी जाहीर केली आहे. 2023-24 हंगामासाठी जाहीर झालेल्या या यादीत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि इशान किशन (IshanKishan) यांची नावे नाहीत. दोन्ही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेतला नव्हता, यामुळे बीसीसीआय या खेळाडूंवर नाराज झाले होते. त्याचा परिणाम वार्षिक करार यादीत दिसून आला आहे.दुसरीकडे उत्तर प्रदेशातील डावखुरा फलंदाज रिंकू सिंगला ग्रेड-सीमध्ये स्थान मिळाले आहे. कर्णधार रोहित शर्माशिवाय (Rohit Sharma) विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा A+ ग्रेडमध्ये आहेत.

बीसीसीआयने यावर्षी 30 खेळाडूंना करार दिला आहे. हा करार 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंतचा आहे. बीसीसीआयने यावेळी नवी परंपराही जारी केली आहे. त्यांनी वेगवान गोलंदाजीचा वेगळा करारही केला आहे. या यादीत आकाश दीप, विजयकुमार वैश्यक, उमरान मलिक, यश दयाल आणि विद्वथ कवेरप्पा यांचा समावेश आहे.ग्रेड A+: रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.

ग्रेड ए+: रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा

ग्रेड ए: रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या.

ग्रेड बी: सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.

ग्रेड सी: रिंकू सिंग, टिळक वर्मा, रुतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसीद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

खेळाडूंना किती पैसे मिळतात?
ग्रेड ए प्लसमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वार्षिक7 कोटी रुपये मिळतात. ए ग्रेडला 5 कोटी रुपये आणि बी ग्रेडला 3 कोटी रुपये मिळतात. सर्वात कमी सी श्रेणीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले जातात.

बीसीसीआयने आपल्या निवेदनात काय म्हटले आहे?
याव्यतिरिक्त, जे खेळाडू या कालावधीत किमान तीन कसोटी किंवा आठ एकदिवसीय सामने किंवा 10 टी-20 खेळण्याच्या निकषांची पूर्तता करतात, त्यांना आपोआप गुणोत्तर आधारावर ग्रेड सीमध्ये समाविष्ट केले जाईल. उदाहरणार्थ- ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांनी आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले आहेत, जर त्यांनी इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पाचव्या कसोटीत भाग घेतला, तर त्यांना सी श्रेणीत समाविष्ट केले जाईल. बीसीसीआयने शिफारस केली आहे की सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसताना त्या कालावधीत देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेण्यास प्राधान्य द्यावे.

महत्वाच्या बातम्या : 

Maharashtra Politics | ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ , विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध

जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन : Rajesh Tope

Interim Budget | राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी