Virat Kohli | “विराट कोहलीने आरसीबीतून बाहेर पडावे, तो ट्रॉफी जिंकण्याचा हक्कदार”, माजी सहकारी खेळाडूचे मोठे क्तव्य

Virat Kohli | आयपीएलचे 17 हंगाम संपले, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चे पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. बुधवारी आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीला राजस्थान रॉयल्सकडून 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह आरसीबी स्पर्धेतून बाहेर पडला.

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन (Kevin Peterson) म्हणाला की, विराट कोहलीला आयपीएल विजेतेपद मिळवण्यासाठी आरसीबी सोडण्याची गरज आहे. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीच्या पराभवावर निराशा व्यक्त करताना पीटरसनने हे मत व्यक्त केले. विराट कोहली फ्रँचायझीचा भार एकहाती उचलत असून चालू मोसमातही त्याने 700 हून अधिक धावा केल्या, पण विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा अधुरेच राहिले, असे पीटरसनचे मत आहे.

फुटबॉलपटूंची दिलेले उदाहरण
केविन पीटरसन म्हणाला की जर विराट कोहलीने (Virat Kohli) आरसीबीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला तर दिल्ली कॅपिटल्स हा त्याच्यासाठी चांगला पर्याय असेल. केपीने क्रिस्टियानो रोनाल्डो आणि हॅरी केन सारख्या दिग्गज फुटबॉलपटूंची उदाहरणे दिली, ज्यांनी यश मिळविण्यासाठी त्यांचे जुने क्लब सोडले.

पीटरसनचे विधान
मी हे आधीही सांगितले आहे आणि मी पुन्हा सांगतो – इतर खेळांमध्ये, महान खेळाडू यश मिळविण्यासाठी वेगवेगळ्या संघात सामील होतात. कोहली खूप मेहनत घेतो, पण जेतेपद पटकावण्यात फ्रँचायझी यशस्वी होत नाही. मला वाटते की कोहली संघाला व्यावसायिक मूल्य आणतो, परंतु तो ट्रॉफी जिंकण्यास पात्र आहे. त्याने अशा संघात खेळले पाहिजे, जे ट्रॉफी जिंकण्यास मदत करू शकेल.

मला विश्वास आहे की दिल्ली हे त्याच्यासाठी योग्य ठिकाण असेल. विराट जर आरसीबीपासून दूर गेला आणि दिल्लीत सामील झाला तर तो घरच्या फ्रँचायझीत जास्त वेळ घालवू शकेल. मला माहित आहे की त्याचे दिल्लीत घर आहे. त्याचे एक तरुण कुटुंब आहे. ते अधिक वेळ घालवू शकतील. जर तो फक्त दिल्लीचा असेल तर तो दिल्ली कॅपिटल्सला का परतत नाही? दिल्लीही बेंगळुरूप्रमाणे विजेतेपद मिळविण्यासाठी हतबल आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप