Shishir Shinde | गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करा

Shishir Shinde On Gajanan Kirtikar | शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी अशी मागणी पत्राद्वारे शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी केलीय…पक्षविरोधी कारवाई केल्याने कीर्तिकरांना पक्षातून निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे शिशिर शिंदेंनी केलीय.

लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्यातील मतदानाच्या दिवशी गजानन किर्तीकरांनी आणि त्यांच्या पत्नीने पक्ष विरोधी वक्तव्यं करून विरोधी पक्ष ठाकरे गटाचे बाजू घेतली…त्यामुळे मातोश्रीचे “लाचार श्री” होणाऱ्यांनी पक्षातून त्वरीत बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी केलीय.

गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर यांना ठाकरे गटाने उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनतर अमोल किर्तीकर हे गजानन किर्तीकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. तसेच गजानन किर्तीकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार निधी अमोल किर्तीकर यांनी स्वत: च्या प्रचारासाठी विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला. मात्र फायदा ठाकरे गटाला झाला असा आरोपही शिशिर शिंदे यांनी केलाय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप