आम्हाला अभिमान आहे आमचा रिक्षावाला मुख्यमंत्री झाला; ठाण्यात रिक्षाचालकांची पोस्टरबाजी

 ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटात सध्या बराच संघर्ष सुरू असून मोठ्याप्रमाणात शिवसैनिक हे द्विधा मनस्थितीत आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांच्या वारसदाराला साथ द्यावी की रक्ताच्या वारसदाराला मदत करावी असा यक्षप्रश्न सध्या सेनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढे आहे. अनेकांनी विनंती करून देखील उद्धव ठाकरे हे कॉंग्रेस – राष्ट्रवादीची (Congress – Nationalist Congress) साथ सोडायला तयार नसल्याने नेते मंडळी शिवसेनेला राम राम ठोकत आहेत असं चित्र सध्या दिसत आहे.

दरम्यान, शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 अशा फरकाने जिंकल्यानंतर शिंदे यांच्या सभागृहातील भाषणावरून उद्धव ठाकरे ( Uddhav Thackrey ) यांनी टोला लगावला होता. रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला होता.

त्यानंतर एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर देखील दिलं होतं. पण जेव्हा पासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत तेव्हपासून रिक्षावाला मुख्यमंत्री (CM Eknath Shinde)असं अभिमानाने सगळीकडे म्हटलं जातंय. ठाण्यात सुद्धा याच संदर्भात पोस्टरबाजी करण्यात आलीये. ही पोस्टरबाजी केलीये ठाण्यातल्या रिक्षा चालकांनी ज्यावर त्यांनी लिहिलंय “होय आम्हाला अभिमान आहे आमचा रिक्षावाला मुख्यमंत्री झाला!”