शिरुर लोकसभा मतदार संघात भोसरी ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असेल, आमदार महेश लाडगेंचा विश्वास

Shirur Loksabha : भोसरी विधानसभा मतदार संघात महायुतीची ताकद निर्णायक असून, गत निवडणुकीत या मतदार संघातून सुमारे ३७ हजार मतांचे लीड आढळराव पाटलांना (Shivajirao Adhalrao Patil) मिळाले होते. आता त्याची पुनरावृत्ती होणार असून, यावेळी १ लाख मातांची आघाडी या मतदार संघातून राहील आणि शिरुर लोकसभा मतदार संघात (Shirur Loksabha) भोसरी ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असेल, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी व्यक्त केला आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरी गावठाण येथे दौरा करण्यात आला. यावेळी आमदार महेश लांडगे यांच्यासह महायुती व घटक पक्षांचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भोसरी विधानसभा मतदार संघातून १ लाख मतांची आघाडी देण्याचा निर्धार भैरवनाथ मंदिरात करण्यात आला. तसेच, ‘‘बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्या…’’ असे आवाहन यानिमित्ताने मतदार, नागरिकांना करण्यात आले.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात झालेला विकास, शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, कल्याणकारी योजना आणि देशाची जागतिक पातळीवर उंचावलेली प्रतिक्षा यामुळे महायुतीला निश्चितपणे मोठा जनाधार आहे. भोसरी मतदार संघातील सुमारे ५ लाख ३५ हजाराहून अधिक असलेले मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असे महेश लांडगे यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा