अरबाजपासून घटस्फोट घेण्याच्या आदल्या रात्री मलायकासोबत काय घडले ?

मुंबई – मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अरबाज खान (Arbaz Khan) यांची जोडी एकेकाळी इंडस्ट्रीतील सर्वात हॉट कपल्सपैकी (Hot Couples) एक होती. असे म्हटले जाते की या दोघांची पहिली भेट एका फोटोशूट दरम्यान झाली होती जिथे ते पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मलायका आणि अरबाजने 1998 मध्ये लग्न केले.

या लग्नापासून त्यांच्या घरी अरहान खान (Arhan Khan) या मुलाचा जन्म झाला. मात्र, लग्नाच्या 19 वर्षानंतर मलायका आणि अरबाजने एकमेकांपासून घटस्फोट घेत सर्वांनाच धक्का दिला.

बातम्यांनुसार, मलायकाच्या कुटुंबीयांनी घटस्फोटाच्या आदल्या रात्री तिला विचारले होते की तिने या घटस्फोटाबाबत योग्य विचार केला आहे का आणि ती आपल्या निर्णयावर ठाम आहे का? मलायका म्हणते की, कोणतेही कुटुंब घटस्फोटासाठी लगेच सहमत होत नाही. यावरून घरामध्ये सुद्धा बरच वाद झाला. त्या रात्री मी खूप रडले असं ती सांगते.

पुढे 2017 पासून एकमेकांपासून वेगळे राहणाऱ्या मलायका आणि अरबाज यांचा 2019 मध्ये घटस्फोट झाला. वृत्तांवर विश्वास ठेवला तर मलाइकाला या घटस्फोटाच्या बदल्यात पोटगी म्हणून 15 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. आज मलायका आणि अरबाज आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत. मलायका अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत असताना, अरबाज खान (Arbaz Khan) देखील इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी (Italian model Georgia Andriani) सोबत  नात्यात आहे.