ज्या पायऱ्यांनावर शिवसैनिकांनी सोमय्यांना चोपलं त्याच पायऱ्यांवर भाजप करणार सत्कार !

पुणे : भाजपा नेते किरीट सोमय्या हे आज पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. ज्याठिकाणी किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. त्याठिकाणी महापालिकेच्या पायऱ्यांवर भाजपातर्फे किरीट सोमय्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तर कॉंग्रेसने किरीट सोमय्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी महापालिकेची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे आदेश प्रशासनकडून देण्यात आले आहेत.

किरीट सोमय्या हे पालिका आयुक्तला भेटण्यासाठी शनिवारी महानगरपालिकेत आले होते. यावेळी शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुक्की केली असता, ते पालिकेच्या पायऱ्यांवर पडले होते. तेव्हा संपूर्ण महापालिकेत गोंधळाचं चित्र निर्माण झाले होते. या झालेल्या प्रकरणानंतर किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांनावर गुन्हा दाखल केला. पुणे पोलिसांनी मग शिवसैनिकांना अटक करण्यात आली व त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला. या प्रकरणानंतर महापालिकेत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.

आज किरीट सोमय्या पुन्हा पुणे दौऱ्यावर येत आहे. सायंकाळी ४ वाजता किरीट सोमय्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. यामुळे बरोबर ४ वाजताच भाजपाकडून पालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार करण्यात येणार आहे. परंतु यावेळी कॉंग्रेस पक्षातर्फे किरीट सोमय्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे. तेव्हा किरीट सोमय्यांणा आजचा दौरा ही गोंधळाचा ठरतो का ? हे आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.