नाना पटोले यांची दिल्लीत काय पत आहे हे त्यांनी आधी सांगावे मग अजितदादांवर बोलावे – सुनील तटकरे

Sunil Tatkare On Nana Patole – नाना पटोले यांची दिल्लीत पत काय आहे हे पहिल्यांदा त्यांनी सांगावे आणि मग अजित पवारांची बोलती आणि दादांचा तोरा याबद्दल बोलावे असे स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी नाना पटोले यांना सुनावले आहे.

प्रदेश कार्यालयात आले असता सुनिल तटकरे यांना पत्रकारांनी अजित पवार यांच्यावर नाना पटोले यांनी केलेल्या टीकेसंदर्भात प्रश्न केला असता सुनिल तटकरे यांनी त्यांचा कडक शब्दात खरपूस समाचार घेतला.

सध्या नाना पटोलेंची बोलती वाढली आहे. नानांच्या बोलतीमुळे महाराष्ट्रात काय काय घडले हे महाराष्ट्राने अनुभवले आहे असा टोला लगावतानाच त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून राजकारणात काय काय घडले याची आठवणही सुनिल तटकरे यांनी करुन दिली.

अजित पवारांची काम करण्याची विशिष्ट पध्दत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने काम करत असतो पण तिघांच्या कार्यपद्धतीच्या शैली जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्या तिघांची एनडीए मजबूत करण्याची दिशा एकच आहे. त्यामुळे संभ्रम असण्याचे कारण नाही. मात्र त्यामुळे धास्तावलेली काही माणसं नको ते कारण शोधत वेगवेगळे शब्दप्रयोग करत आहेत असा थेट हल्लाबोलही सुनिल तटकरे यांनी केला.

दिल्लीत आपला तोरा किती आहे, राज्यात किती आहे, आपल्या पक्षातील नेते आपल्याला किती मानतात हे पहिले नाना पटोले यांनी सांगावे मग इतरांवर बोलावे असेही खडेबोल सुनिल तटकरे यांनी सुनावले.

https://youtu.be/j_RAemrZOnM?si=AzEv6lHWz-E94ZLF

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकशाहीची तत्त्वे आणि जनतेची इच्छा सातत्याने जोपासली आहे – राष्ट्रवादी

निवडणूक आयोगाचा पेपर फुटलेला नाही तर हा पेपर स्वच्छ समोर आहे – Sunil Tatkare

राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी व समस्या राज्यपालांनी सोडवाव्यात :- Nana Patole