अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार ?, मनी लॉंड्रीग प्रकरणात वाझेंचा ईडीला अर्ज

मुंबई : मनी लॉड्रिंग प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील दुसरे आरोपी सचिन वाझेंनी इडीकडे अर्ज सादर केला आहे. तसेच त्याने माफिचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणातील सगळी माहिती न्यायालयात सांगू, असं वाझेंनी इडीच्या सहाय्यक संचालकाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे सचिन वाझेंना माफिचा साक्षीदार होण्याची परवानगी मिळणार का ? आणि जर परवानगी मिळाली तर सचिन वाझेंची साक्ष अनिल देशमुख यांना अडचणीत आणणार का ? याकडे लक्ष लागून आहे.

मुकेश अंबानीच्या घराबाहेर सापडलेल्या प्रकरणानंतर हे प्रकरण १०० कोटींच्या आरोपापर्यंत जाऊन पोहचलं आहे. विरोधकांनी हे प्रकरण जोरदारपणे लावून धरल्याने सचिन वाझेंना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं आहे तर अनिल देशमुख यांना त्यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

मागच्या वर्षी अंबानीच्या घराबाहेर एका गाडीत स्फोटक ठेवण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हांमध्ये वळले आहे. यात राज्यात जो गैरव्यवहार झालेला होता तो बाहेर काढण्यात आला आहे. याबाबतीत अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार देखील व्हावं लागलं आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती. त्यानंतर इडीने यांच्यावर आता कारवाई करण्याचा बडगा उचलला आहे. सचिन वाझे आणि परमबीर सिंग हे अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत आहेत.

बार मालकांनी पैसे घेतल्याचा आरोप सचिन वाझेंनी अनिल देशमुख यांच्यावर केलेला होता. ते पैसे अनिल देशमुख यांच्या शिक्षण विभागात ट्रान्सफर केल्याचा दावा वाझेंनी केला. याचाच तपास ईडीने केला आहे. या तपासात ईडीला अनिल देशमुख यांच्या कंपन्यामधून ४ कोटी ७० लाख रूपये हे वळते झाल्याचे समजले होते. सचिन वाझे हे या प्रकरणातील काही गोष्टी इडीला सांगत असतील तर अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.