मी आणि दानवे हे 40 वर्षांपासून मित्र आहोत; खोतकारांचा स्वर बदलला 

नवी दिल्ली- शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आता माजी आमदार तथा शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांची भर पडण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वी खोतकर दिल्लीत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यांनतर खोतकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीचा शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे आता एकत्र आले आहे. रावसाहेब दानवे यांच्या घरी खोतकर यांनी ब्रेकफास्टसाठी बोलावण्यात आले होते. दोन्ही नेत्यामध्ये तब्बल तासभर बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिलजमाई झाल्यानंतर ही बैठक पार पडली.

मी अजूनही शिवसेनेत आहे की नाही, याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे, तो मी घेणार आहे. एकनाथ शिंदे यांची सहज भेट घेतली होती, मी माझ्या मतदारसंघात गेल्यानंतर माझी भूमिका स्पष्ट करणार आहे, असं खोतकर म्हणाले. मी आणि दानवे हे 40 वर्षांपासून मित्र आहोत. आम्ही वेगवेगळ्या गटामध्ये असलो तरी चांगले मित्र आहोत. त्यांनी मोठ्या प्रेमाने मला चहा पिण्यासाठी बोलावले होते, त्यामुळे भेटीसाठी आलो, असं खोतकरांनी सांगितलं.