कॉंग्रेसचा खेळ बसपा सुप्रीमो मायावती बिघडवणार ? ‘त्या’ ३९ जागांवर लक्ष केले केंद्रित

Rajasthan News: बसपा सुप्रीमो मायावती यांनी आता राजस्थानच्या राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी ट्विट करत थेट अशोक गेहलोत सरकारवर हल्लाबोल केला आहे. या ट्विटमध्ये मोठी गोष्ट म्हणजे अशोक गेहलोत सरकारच्या किमान उत्पन्न हमी योजनेचा उल्लेख करताना मायावतींनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मायावतींनी सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बसपा सुप्रीमो मायावती अशोक गेहलोत सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. निवडणुकीच्या रणनीतीसाठी बसपा राजस्थानच्या ग्रामीण भागात गावोगावी आणि घरोघरी जाण्याची तयारी करत आहे. बसपाही दलित मतदारांवर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करत आहे. सर्व जागांवर बसपा पूर्ण लक्ष केंद्रीत करत आहे.

राजस्थानमध्ये बसपा 60 विधानसभा जागांवर ताकदीने निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. या त्या जागा आहेत जिथे काँग्रेसचा बालेकिल्ला होता. राजस्थानमध्ये, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी सुमारे 39 जागा राखीव आहेत. त्या सर्व जागांवर बसपाचे पूर्ण लक्ष आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तेथे बसपचे लोक कार्यक्रम आयोजित करत आहेत.