Nana Patole | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष सरवण्याचे काम

Nana Patole | अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व केवळ राजकीय द्वेषातून केलेला आहे. मोदी सातत्याने सनातन धर्म, अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख करत काँग्रेस व विरोधी पक्षांना हिंदू विरोधी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात. नरेंद्र मोदी जातीच्या व धर्माच्या नावाने समाजात द्वेषाचे विष पसरवण्याचे पाप करत आहेत, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिले आहे.

नरेंद्र मोदी व भाजपाचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा व नरेंद्र मोदींनी बजरंग बलीच्या नावाने मते मागितली परंतु बजरंग बलींनी भाजपाच्या डोक्यावर गदा घालून सपशेल आपटले. आताही मोदी धार्मिक मुद्दे पुढे करत प्रभू रामाच्या नावावर मते मागत आहेत पण प्रभू रामचंद्रही बजरंग बली प्रमाणे भारतीय जनता पक्षाला जागा दाखवतील. खोटी आश्वासने देऊन १० वर्ष सत्ता मिळवली, या १० वर्षात काय काम केले हे मोदी सांगू शकत नाहीत. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांच्याबद्दल ते बोलू शकत नाहीत म्हणून प्रत्येक सभेत मोदी धर्माच्या नावावर मते मागत आहे. हिंमत असेल तर मोदींनी विकासाच्या नावावर मते मागून दाखवावी.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन