इंडोनेशियात मांजरीच्या ‘शी’पासून बनलेली कॉफी विकतात ४० हजारांना, वाचा Cat बद्दलची १० रंजक तथ्ये

कुत्रा (Dog) हा अनेकांचा आवडता पाळीव प्राणी आहे. ईमानदारी आणि घराचे संरक्षण करणे या गुणांमुळे कुत्र्यांची लोकप्रियता जास्त आहे. कुत्र्यांप्रमाणेच मांजर (Cat) हा प्राणीही माणसाच्या अगदी जवळचा आहे. स्त्रिया आणि लहान मुलांना तर मनी म्याऊचे विशेष आकर्षण असते. मांजर पाळणारे लोक तर त्यांच्या खाण्याच्या पिण्याच्या आवडीपासून मांजरीबद्दल सर्वकाही माहिती ठेवतात. परंतु मंडळी, या विशेष लेखात आम्ही तुम्हाला मांजरीबद्दलच्या काही माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

मांजरीबद्दलच्या १० माहित नसलेल्या (Unknown Facts About Cat) रंजक गोष्टी- 

१. मांजर जगातील सर्वात लोकप्रिय पाळीव प्राणी आहे.
२. साधारणपणे एका मांजराचं वय हे १२ ते १८ वर्षापर्यंत असतं.
३. जगातील सर्वात महागडी कॉफी इंडोनेशियातल्या एक प्रकारच्या वन्य जातीतल्या मांजरीच्या ‘शी’ पासून बनवली जाते. या कॉफीसाठी प्रत्येकी ५०० ग्रॅमसाठी १०० ते ६०० डॉलर (६८०० ते ४०८०० भारतीय रुपये) किंमत मोजावी लागते.
४. दर वर्षी ४० हजार मांजरीना आशियाई देशांमध्ये खाऊन फस्त केलं जातं.
५. मांजर जवळ जवळ १०० प्रकारचे आवाज काढू शकते तर कुत्रा फक्त १० प्रकारचे आवाज काढू शकतो.
६. असं म्हणतात की मांजर पाळण्यामध्ये इजिप्शियन लोक जगात सर्वात पुढं होते. पण काही वर्षांपूर्वी भूमध्य प्रदेशातील सायप्रसमध्ये झालेल्या शोधात जगातील पहिली पाळीव मांजर ९५०० वर्ष जुनी असल्याचे उघड झालं आहे.
७. ‘फेलिसिटी’ नावाची फ्रेंच मांजर अवकाशात जाणारी पहिली मांजर होती. संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी १९६३ साली फेलिसिटीला अवकाशात पाठवले होते.
८. हिंदू शास्त्राप्रमाणे कोणत्याही व्यक्तीच्या हातून जर मांजराची हत्या झाली तर त्याला काशीला जाऊन सोन्याची मांजर घडवून त्याचे दान करावे लागते.
९. एक मांजर दिवसाला साधारणपणे १६ तास झोपते. म्हणजे नऊ वर्षांची मांजर तिच्या आयुष्याचे फक्त ३ वर्ष जागी असते.
१०. मांजर फक्त माणसांना बघूनच म्यॅव करते. दुसऱ्या मांजराला बघून फक्त गुरगुरणे किंवा हिस्सचा आवाज काढते.