बप्पी दा ‘इतक्या’ संपत्तीचे होते मालक; भारताचा गोल्ड मँन म्हणून ओळख

नवी दिल्ली : पॉप आणि रॉक संगीत क्षेत्रातील ओळखले जाणारे प्रसिद्ध गायक बप्पी लाहिरी यांची प्रकृती बिघडल्याने क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. पॉप आणि रॉक म्युझिकची क्रेझ चाहत्यांच्या मनात घर निर्माण करणाऱ्या बप्पी दा च्या निधनाची बातमी सगळ्यांना धक्का लावून गेली. क्रिकेटर युवराज सिंग, आदित्य राज, हंसल मेहता यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. ते ६९ वर्षांचे होते. तसेच त्यांना कोरोनाची देखील लागण झाली होती.

बप्पी दा हे सोन्याचे फार शौकीन होते. ते अनेकदा आपल्या अंगावर सोनं घालून फिरत असे. बप्पी लाहिरी यांना अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेस्ली फार आवडत होत्या. त्याला अनेकदा बप्पी दा ने सोन्याची साखळी आणि सोन्याचा पोशाख घालताना बघितले. त्यांची अनेकदा गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये भेट झाली. त्यावेळी ते त्यांच्या अंगावरील सोन्याला स्पर्श करीत. त्यानंतर बप्पी दा ने देखील अंगावर सोनं घालण्यास सुरुवात केली. त्यामुळेच भारतीय संगीत क्षेत्रातील भारताचा गोल्ड मँन म्हणून देखील बप्पी दा ओळख झाली होती.

बप्पी दा सोन्याचे शौकीन होतेच परंतु त्यांच्या पत्नी चित्रांशीलाही हिऱ्याची फार आवड होती. तसेच गायकी बरोबरच त्यांना राजकारणात देखील रस होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा उल्लेख केला होता. त्यावरून त्यांच्याकडे ७५२ ग्रँम सोने आणि ४.६२ किलो चांदी होती. त्यांच्या पत्नी चित्रांशी कडे २०१४ मध्ये ९६७ ग्रॅम सोने, 8.9 किलो चांदी आणि 4 लाखांहून अधिक हिरे होते.