Ajit Pawar | आचासंहिता उठल्यावर भोरमधील एमआयडीसीचे काम पूर्ण करण्याचे अजित पवारांनी दिले आश्वासन

Ajit Pawar | मला विकासाची आवड आहे. मला कामाची आवड आहे. म्हणून मी विकासासोबत निघालो आहे. मी जेव्हा 91 साठी खासदार झालो तेव्हा पिंपरी चिंचवड हवेली परिसराचा कायापालट केला, अनेक विकासाच्या गोष्टी मी इथे केल्या. याचा अर्थ विकास आम्ही करतो नुसती वेळ मारून येत नाही. तुम्ही ज्या आमदाराला 2019 मध्ये निवडून दिले त्यांनी तुम्हाला एमआयडीसी बनवून देतो, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते आजही पूर्ण झालेले नाही. मग तोच आमदार पुन्हा मत मागायला कसा येतो? माझ्यासारख्याला तर लाजच वाटली असती, अशी टीका अजित पवार (Ajit Pawar) यांनी भोर वेल्हे येथील आमदार संग्राम थोपटे यांच्यावर नाव न  घेता केली. तसेच आचासंहिता उठल्यावर आपण येथील एमआयडीसीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देखील दिले.

बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत भोर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले, मी एकतर शब्दाचा पक्का आहे. कामाच्या बाबतीत कडक देखील आहे.  पण काम करणाऱ्या माणसांना आपलंस करण्याच पण मला येतं. आम्ही पण शेतकरी आहोत. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारी माणस नाहीत. पण एमआयडीसी करायची म्हटली की त्याला जागा जास्त लागते त्यामुळे जी बिगर शेतीची जागा आहे व मोकळी मोठी जागा आहे, अशा जागा एमआयडीसीसाठी आवश्यक आहेत. त्या बदल्यात आपण शेतकऱ्यांना जास्ती पटीने मोबदला देखील देऊ. त्यामुळे लवकरच एमआयडीसीचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी नागरिकांना दिले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन