अजब गजब प्रेमकथा! ३५ वर्षीय पाकिस्तानी तरुण ७० वर्षांच्या कॅनेडीयन आजींच्या प्रेमात पडला

Love Affair: असं म्हणतात की, प्रेमात वय, रंग, रुप पाहिलं जात नाही. असंच एक प्रेमप्रकरण आता समोर आलंय, ज्यात दोघांमधील वयाचे अंतर हे प्रेमकथेचे वैशिष्ट्य बनले आहे. एका 35 वर्षीय पाकिस्तानी मुलाने 70 वर्षाच्या कॅनेडीयन महिलेला आपलं जीवन साथी बनवलं आहे.

डेली पाकिस्तानच्या रिपोर्ट्नुसार या व्यक्तीच नाव नईम आहे. आपल्या प्रेमकहनीविषयी सांगताना नईम म्हणाला, मी आणि माझ्या पत्नीमध्ये जवळपास दशकभरापूर्वी फेसबुकवर मैत्री झाली होती. 2017 मध्ये आमच्यात लग्नाबद्दल चर्चा झाली होती.

नईम आणि कॅनेडीयन महिलेमध्ये आधी फक्त मैत्री होती. ही मैत्री पुढे कधी प्रेमात बदलली, हे त्यांना सुद्धा समजलं नाही. या कपलच्या वयामध्ये मोठ अंतर आहे, त्यावरुन लोक बऱ्याच चिंता व्यक्त करत आहेत. वयोवृद्ध महिला लग्नासाठी स्वत: कॅनडाहून पाकिस्तानात आली. पत्नीसोबत कॅनडाला स्थायिक होण्याची योजना असल्याच नईमने सांगितलं.

दोघांच्या वयामधील अंतर पाहून दोघांना मोठ्या प्रमाणात टोमणे मारले जात आहेत. त्यातही नईमने पैशांसाठी कॅनेडियन महिलेशी लग्न केल्याचे म्हटले जात आहे. याबद्दल बोलताना नईम म्हणाला की, माझी बायको श्रीमंत कुटुंबातील नाही. ती फक्त पेन्शनवर अवलंबून आहे.

https://youtu.be/FA8bsQpyrSM?si=LGgNkLbw7xLVtJ7f

महत्त्वाच्या बातम्या-
चंद्रयान करिता साहित्य बारामतीतून जाणे हे अभिमानास्पद बाब – MP Supriya Sule
बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार; Boys-4मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी
महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती