‘तुझ्या वडिलांनी कित्येक वर्ष तुझ्या आईचं शोषण केलं आणि तू..’ अभिनेत्रीचे सलमानवर गंभीर आरोप

Somy Ali Cryptic Note For Salman Khan: बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याची एक्स गर्लफ्रेंड (Salman Khan Ex Girlfriend) सोमी अलीने पुन्हा एकदा सुपरस्टारवर गंभीर आरोप केले आहेत.

नुकतीच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सलमान खानच्या विरोधात एक पोस्ट शेअर केली होती, जी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या पोस्टमध्ये सोमी अलीने सलमान आणि त्याचे वडील सलीम खान (Saleem Khan) यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

“सलमान खान तू माझं सगळं काही हिरावून घेतलंस. तू तुझ्या वडिलांसारखाच आहेस. त्यांनी कित्येक वर्ष तुझ्या आईचं शोषण केलं आणि तू नुसता बघत राहिलास. एका मुलाचं कर्तव्य म्हणून तू तुझ्या आईची मदत केली नाहीस. आणि तुझ्या वडिलांनाच तू आदर्श मानलंस. तू तुझ्या सगळ्या गर्लफ्रेंडला मारहाण केलीस. मला एकदा कतरिना कैफने फोन केला होता. मी या सगळ्या गोष्टी माझ्या आत्मचरित्रातही मी लिहणार आहे. तुझी वेळ आता संपत आली आहे.” असे सोमी अली म्हणाली आहे.

https://youtu.be/FA8bsQpyrSM?si=LGgNkLbw7xLVtJ7f

महत्त्वाच्या बातम्या-
चंद्रयान करिता साहित्य बारामतीतून जाणे हे अभिमानास्पद बाब – MP Supriya Sule
बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार; Boys-4मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी
महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती